Saturday, July 6, 2024
Homeमुंबई स्पेशलउद्या विक्रोळी, भांडुप,...

उद्या विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात पाणी नाही!

मुंबई महापालिकेकडून उद्या, शुक्रवारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प कामांतर्गत टी विभागामध्ये फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रापर्यंत गोरेगाव-मुलुंड जोडरस्तालगत अस्तित्त्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २४ ते २५ मे २०२४दरम्यान २४ तासांसाठी एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १२०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या मध्ये येत असल्याने ती वळविणे गरजेचे आहे.

पालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर X १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम उद्या, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून शनिवारी, २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत (२४ तासांसाठी) मुलुंड (पश्चिम)मध्ये गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत एन, एस व टी विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

१. एन विभाग- विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

पाणी

२. एस विभाग- नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा  संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते  ३२  व २०३ ते २१७ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

३. एस विभाग– मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्गलगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. ए. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी १०.००) – २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

४. टी विभाग– मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठा २४ x ७ तास) – २४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!