Homeमुंबई स्पेशलमुंबईत २० सप्टेंबरला...

मुंबईत २० सप्टेंबरला उसळणार सर्वात उंच लाटा!

यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२४ या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असणार आहेत. हे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदाच्या पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. यापैकी ७ दिवस जून महिन्यातील, ४ दिवस जुलै महिन्यातील, ५ दिवस ऑगस्ट महिन्यातील तर सप्टेंबर महिन्यातील ६ दिवस आहेत. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबरला मध्यरात्री १ वाजून ०३ मिनिटांनी उसळणार असून या लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असेल.

यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मोठ्या भरतीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

पावसाळ्यातील अधिक उंचीच्या लाटांचा तपशिल खालीलप्रमाणे-

जून – २०२४

१. बुधवार, ०५.०६.२०२४ सकाळी ११.१७ वा. ४.६१ मीटर.

२. गुरुवार, ०६.०६.२०२४ दुपारी १२.०५ वा. ४.६९ मीटर.

३. शुक्रवार, ०७.०६.२०२४ दुपारी १२.५० वा. ४.६७ मीटर.

४. शनिवार, ०८.०६.२०२४ दुपारी ०१.३४ वा. ४.५८ मीटर.

५. रविवार,  २३.०६.२०२४ दुपारी ०१.०९ वा. ४.५१ मीटर.

६. सोमवार, २४.०६.२०२४ दुपारी ०१.५३ वा. ४.५४ मीटर.

७. मंगळवार, २५.०६.२०२४ दुपारी ०२.३६ वा. ४.५३ मीटर.

लाटा

जुलै – २०२४

१. सोमवार, २२.०७.२०२४ दुपारी १२.५० वा. ४.५९ मीटर.

२. मंगळवार, २३.०७.२०२४ दुपारी ०१.२९ वा. ४.६९ मीटर.

३. बुधवार, २४.०७.२०२४ दुपारी ०२.११ वा. ४.७२ मीटर.

४. गुरुवार, २५.०७.२०२४ दुपारी ०२.५१ वा. ४.६४ मीटर.

ऑगस्ट – २०२४

१. सोमवार, १९.०८.२०२४ सकाळी ११.४५ वा. ४.५१ मीटर.

२. मंगळवार, २०.०८.२०२४ दुपारी १२.२२ वा. ४.७० मीटर.

३. बुधवार, २१.०८.२०२४ दुपारी १२.५७ वा. ४.८१ मीटर.

४. गुरुवार, २२.०८.२०२४ दुपारी ०१.३५ वा. ४.८० मीटर.

५. शुक्रवार, २३.०८.२०२४ दुपारी ०२.१५ वा. ४.६५ मीटर.

सप्टेंबर – २०२४

१. मंगळवार, १७.०९.२०२४ सकाळी ११.१४ वा. ४.५४ मीटर.

२. बुधवार, १८.०९.२०२४ सकाळी ११.५० वा. ४.७२ मीटर.

३. गुरुवार, १९.०९.२०२४ मध्यरात्री ००.१९ वा.  ४.६९ मीटर, दुपारी १२.२४ वा. ४.७८ मीटर.

४. शुक्रवार, २०.०९.२०२४ मध्यरात्री ०१.०३ वा. ४.८४ मीटर, दुपारी ०१.०२ वा. ४.७० मीटर.

५. शनिवार, २१.०९.२०२४ मध्यरात्री ०१.४७ वा. ४.८२ मीटर, दुपारी ०१.४२ वा. ४.५० मीटर.

६. रविवार, २२.०९.२०२४ मध्यरात्री ०२.३३ वा. ४.६४ मीटर.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content