गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्समधील अग्रणी कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकींच्या इब्लू श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटीमध्ये मोठ्या वाढीची नुकतीच घोषणा केली.
२५ एप्रिल २०२४पासून गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या ईव्ही दुचाकी इब्लू फिओ श्रेणीमधील बॅटऱ्यांसाठी वॉरंटी प्रभावी ५ वर्षं किंवा ५०,००० किलोमीटर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे (जे पहिले लागू असेल ते). तसेच इब्लू रोझी व इब्लू रायनो यांचा समावेश असलेल्या कंपनीच्या ईव्ही तीन-चाकी श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटी ५ वर्षं किंवा ८०,००० किलोमीटर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे (जे अगोदर येईल ते). ही नवीन वॉरंटी कालावधी भारतीय इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेत सर्वात सर्वसमावेशक आहेत.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्हणाले की, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आमचा पर्यावरणादृष्ट्या अनुकूल असण्यासोबत विश्वसनीय, किफायतशीर व विनासायास मालकी अनुभव देणाऱ्या इलेक्ट्रिक वेईकल्स प्रदान करत शाश्वत गतीशीलतेप्रती परिवर्तनाला गती देण्याचा दृष्टीकोन आहे. इंडस्ट्री-बेस्ट बॅटरी वॉरंटी प्रदान करत आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्याप्रती आमचा अविरत विश्वास, तसेच इलेक्ट्रिक वेईकल्सच्या अवलंबतेमधील अडथळ्यांना दूर करण्याप्रती आमची कटिबद्धता दाखवत आहोत. या पुढाकारामधून ग्राहकांना अपवादात्मक मूल्य देण्यासाठी आमचा उत्साह आणि आमचे अविरत प्रयत्न दिसून येतात.
विस्तारित बॅटरी वॉरंटी गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या संशोधन व विकासामधील सातत्यपूर्ण गुंतवणुकीला सार्थ ठरवते, जेथे तडजोड न करता कामगिरी, रेंज व टिकाऊपणाची खात्री घेण्यासाठी अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानांचा फायदा घेतला जात आहे. या उद्योग-अग्रणी वॉरंटीसह ग्राहक समाधान आणि मालकीहक्काच्या कमी खर्चाचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक वेईकल उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित होत आहेत.