Homeबॅक पेजवरूण धवन 'एन्‍व्‍ही'चा...

वरूण धवन ‘एन्‍व्‍ही’चा ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर!

एन्‍व्‍ही, या भारतातील आघाडीच्‍या प्रिमिअम फ्रॅग्रनन्‍स ब्रॅण्‍डने बॉलिवुड सेलिब्रिटी वरूण धवनची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून नुकतीच निवड केली आहे. त्‍याचे साहसी व डायनॅमिक व्‍यक्तिमत्त्व आणि साहसी उत्‍साह ब्रॅण्‍डच्‍या ‘लेट देम एन्‍व्‍ही’ दृष्टिकोनातून दिसून येतात.

एन्‍व्‍ही त्‍यांच्‍या डिओडरण्‍ट्स आणि परर्फ्युम्‍ससह विशेष फ्रेंच फ्रॅग्रन्‍सेससाठी ओळखला जातो. एन्‍व्‍हीला तरूणांचा आवडता ब्रॅण्‍ड म्‍हणून लोकप्रिय करण्याचा यामागचा उद्द्येश आहे. ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून वरूण धवनची निवड त्‍यांच्‍या दीर्घकालीन विस्‍तारीकरण योजनेचा भाग आहे. या धोरणात्‍मक पुढाकाराच्‍या माध्‍यमातून एन्‍व्‍ही आपले ब्रॅण्‍ड प्रमोशन करणार आहे. या सहयोगाचा भाग म्‍हणून वरूण धवन ब्रॅण्‍डच्‍या आगामी मल्‍टी-चॅनेल कॅम्‍पेन आणि विपणन उपक्रमांसह टीव्‍हीसी आणि सोशल मीडिया मोहिमांमध्‍ये पाहायला मिळणार आहे. वरूण धवन युथ आयकॉन आहे आणि त्‍याची ‘तडजोड न करणारी’ वृत्ती एन्‍व्‍हीच्‍या डीएनएशी परिपूर्ण जुळते. त्‍याची स्‍टाइल आणि अविरत ऊर्जा एन्‍व्‍हीची उत्‍साहीपणाप्रती कटिबद्धता आणि ग्राहकांना अपवादात्‍मक फ्रॅग्रन्‍स प्रदान करण्‍याच्‍या मिशनशी पूरक आहे.

हॅमिल्‍टन सायन्‍सेस प्रा. लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक सौरभ गुप्‍ता म्‍हणाले की, ‘एन्‍व्‍हीमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, फ्रॅग्रन्‍सेसचा व्‍यक्‍तीच्‍या आत्‍मविश्‍वासावर सकारात्‍मक प्रभाव पडू शकतो. वरूण धवन आमच्‍या ब्रॅण्‍डसाठी परिपूर्ण आहे, जेथे आमची उत्‍पादने तरूणांचे लक्ष वेधून घेतात. आजच्‍या तरूणांचे व त्‍यांच्‍या वृत्तींचे प्रतिनिधीत्‍व करण्‍यासाठी वरूणपेक्षा अधिक उत्तम कोण असेल? त्‍याची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि अविरत आत्‍मविश्‍वास आमच्‍या ब्रॅण्‍डमूल्‍यांशी परिपूर्णपणे संलग्‍न आहेत. स्क्रिप्‍टसाठी हुशारी व वैविध्‍यतेची उत्तम भावना असलेल्‍या व्‍यक्‍तीची मागणी होती आणि वरूण ब्रॅण्‍डमध्‍ये गतीशीलता व ऊर्जा घेऊन येतो. आम्‍हाला विश्‍वास आहे की हा सहयोग गेमचेंजर ठरेल आणि एन्‍व्‍हीला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल.

एन्‍व्‍ही व्‍यापक आर अँड डी प्रयत्‍नांचे पाठबळ असलेला आपला उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍याकरीता कटिबद्ध आहे. आम्‍ही या वर्षामध्‍ये आमचा मार्केट शेअर दुप्‍पट करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत. हॅमिल्‍टन सायन्‍सेस प्रा. लि. मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि भारतीय ग्राहकांना उच्‍च दर्जाची उत्‍पादने प्रदान करण्‍याच्‍या एन्‍व्‍हीच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देत आहे. वरूण धवनसोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा हा ब्रॅण्‍ड वाढवण्‍याचा आमचा मानस आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content