Homeबॅक पेजअभिलेखागारांच्या पुनरुज्जीवनासाठी होणार...

अभिलेखागारांच्या पुनरुज्जीवनासाठी होणार एआयचा वापर

राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. यामध्ये राज्य /केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन आणि अभिलेखागार व्यवस्थापन प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि त्यासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याची गरज अधोरेखित केली.

दोन दिवस चाललेल्या या बैठकीत दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या सहभाग घेतला होता, तर हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रतिनिधी दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते. दोन दिवस सुरू असलेल्या या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींनी आपापल्या राज्य

एआय

/ केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या दस्तावेजांचे जतन आणि सामायिकीकरण करण्यासाठी आणि वेब-पोर्टलद्वारे त्यांचे संग्रहण करून ही संसाधने सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित दृष्टिकोन स्वीकारण्यावर सर्वांनी सहमती दर्शविली.

प्रतिनिधींनी अभिलेखांच्या डिजिटायझेशनच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यप्रणाली (SOPs) तयार करण्यासाठी नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाचे मार्गदर्शन मागितले. एनएआयच्या सहकार्याने (NAI), राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक अभिलेखागारांचे स्रोतांचे मौखिक रीतीने आणि अपारंपरिक पद्धतीने एकत्रिकरण करणे यासारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यासदेखील राष्ट्रीय पुरालेखपाल समितीने या बैठकीत मान्यता दिली.

पुरालेखपालांच्या राष्ट्रीय समितीची पुढील बैठक या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणार आहे.

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content