Homeबॅक पेजटीमलीज एजटेक, राज्यशासन...

टीमलीज एजटेक, राज्यशासन आणि एनसीडीसी आले एकत्र

महाराष्ट्रातील तरूणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून टीमलीज एजटेक, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग (डीएचटीई) – महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांनी एकत्र येऊन एका पथदर्शक भागीदारीची नुकतीच घोषणा केली. या भागीदारीचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये व्यवसायसंबंधी अध्ययन उपक्रमांच्या क्षमतेचा वापर करण्याचे आहे. त्यातून देशाची २०२८पर्यंत म्हणजे पुढील पाच वर्षांत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्यात योगदान दिले जाईल. त्यासाठी वार्षिक १७.१३ सीएजीआरची वार्षिक वाढ होणे अत्यावश्यक आहे. 

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भागीदारीच्या प्रादेशिक फोकसवर भर दिला. ही भागीदारी महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणासाठी खूप महत्त्वाची आहे. ती आमच्या तरूणांच्या रोजगारक्षमतेवर थेट प्रभाव टाकेल. त्यातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फक्त पदवीच नाही तर बदलासह पदवी मिळू शकेल. त्यांना खऱ्या जगातील कौशल्ये आणि अनुभव मिळू शकतील. आम्ही जॉब मार्केटच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण आणि रोजगारक्षमतेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत व आमचे विद्यार्थी महाराष्ट्राची वाढ तसेच प्रगतीमध्ये योगदान देतील, याची आम्ही काळजी घेऊ, असे ते म्हणाले.

हा उपक्रम टीमलीझ एजटेकच्या डिजिव्हर्सिटी या टेक फर्स्ट प्रोग्रामच्या माध्यमातून चालवला जाईल. त्यात शैक्षणिक अभ्यास आणि खऱ्या जगातील कामाचे अनुभव एकत्र आणले जातात. टीमलीज एजटेककडून भारतातील सर्वोच्च दर्जाची विद्यापीठे आणि आघाडीचे कर्मचारी यांच्यामार्फत शिक्षण आणि रोजगार यांच्यातील महत्त्वाची दरी सांधण्यासाठी नावीन्यपूर्ण व्यवसायसंबंधी पदवी अभ्यासक्रम आणले जातात. या मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाबाबत योग्य ते निर्णय घेणे आणि त्याचवेळी अमूल्य प्रॅक्टिकल कामाचा अनुभव मिळवणे शक्य होते. हा उपक्रम टीमलीज एजटेक आणि एनएसडीसी यांच्यादरम्यान असलेली एक पथदर्शक भागीदारी आहे. ही धोरणात्मक भागीदारी भारतातील शैक्षणिक अध्ययन आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यांच्यातील नातेसंबंध प्रस्थापित करून महाराष्ट्रातील उच्चशिक्षण आणि रोजगारक्षमता यांच्यातील दरी सांधण्याचा प्रयत्न करेल. व्यापक व्याप्तीसाठी कामाचा समावेश असलेले उपक्रमदेखील एनएसडीसीच्या स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणीकृत केले जातील.

ही भागीदारी करा आणि शिका, शिकताना कमवा व एनहान्स्ड एम्प्लॉयर सिग्नलिंगद्वारे भारताचा ग्रॉस एन्रोलमेंट रेशो वाढवण्यासाठी सज्ज आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील विद्यापीठांना रोजगारक्षमता वाढवणे आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करणे शक्य करतो. त्याचबरोबर त्यांना फक्त लेखी ज्ञान नाही तर आवश्यक ती प्रात्यक्षिक कौशल्ये आणि कार्यानुभव मिळेल याचीही काळजी घेतो. महत्त्वाचे म्हणजे हा उपक्रम भारतातील कॉर्पोरेट्सच्या उत्तम टॅलेंट पुरवठा साखळीची गरज पूर्ण करतो. ही साखळी आजच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी महत्त्वाची ठरते.

टीमलीज एजटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज यांनी या समन्वयाबाबत आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले की, आमचे ध्येय सहजसाध्य, उच्च दर्जाचे आणि स्केलेबल अध्ययन उपाययोजना निर्माण करून देशभरात पदवी रोजगारक्षमता वाढवण्याचे आहे. डीएचटीई आणि एनएसडीसी यांच्यामधील भागीदारी उच्चशिक्षण अधिक सुसंगत आणि अर्थपूर्ण बनवण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कार्यानुभव आणि शैक्षणिक अध्ययन यांना एकत्रित आणून आमचे ध्येय भारतातील तरूणांना आजच्या रोजगार बाजारपेठेत आवश्यक असलेली कौशल्ये देण्याचे आणि उद्याच्या मनुष्यबळाला आकार देण्याचे आहे.

वर्क इंटिग्रेटेड डिग्री प्रोग्रामधील सहभागींना पदवीनंतर ऑन दि जॉब इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप मिळेल. त्यामुळे त्यांना आवश्यक ती कौशल्ये आणि कामाचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला आपल्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मासिक स्टायपेंड दिला जाईल. त्याद्वारे खऱ्या अर्थाने कमवा आणि शिका संकल्पना अस्तित्त्वात येऊ शकेल, असे मत व्यक्त करताना एनएसडीसीचे इम्पॅक्ट फायनान्स अँड पार्टनरशिप मॅनेजमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष संजीवा सिंग यांनी महाराष्ट्रातील तरूणांच्या रोजगारयोग्यतेला चालना देण्यासाठीच्या संयुक्त प्रयत्नांना अधोरेखित केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नवप्रवर्तन आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे. या भागीदारीद्वारे आम्ही आमच्या राज्यात उच्चशिक्षणाची नवनवीन मानके स्थापित करत आहोत. आमच्या शैक्षणिक संस्था आपल्या अर्थव्यवस्थेच्या बदलत्या मागण्यांशी सुसंगत राहतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. टीमलीज एजटेक, एनएसडीसी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यामधील ही भागीदारी आमच्या तरूणांना भविष्यासाठी आवश्यक ती कौशल्ये देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावेल तसेच महाराष्ट्राच्या जागतिक आर्थिक पॉवरहाऊस होण्याच्या ध्येयात मोठे योगदान देईल, असे मत महाराष्ट्र शासनाचे उच्चशिक्षण प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी व्यक्त केले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content