Homeबॅक पेजमुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून होणार धन कुबेर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धन कुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साधुसंत, मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत आजपासून होत आहे. आज 11 मार्च ते 13 मार्च 2024 रोजी असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.

पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून पहिल्यांदाच धन कुबेर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री. अंबामाता, श्री महादेव, श्रीकृष्ण, राममंदिर, श्री विठ्ठल, श्री परशुराम, श्री लक्ष्मी नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दि. 11 व 12 मार्चला मूर्तीपूजन भजन उत्सव आयोजित करण्यात आला असून आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, हवालदार दुबे, ओमप्रकाश शर्मा (अध्यक्ष परशुराम सेना), प्रतीक (गुड्डू) राय, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी यांच्याकडे नियोजन असणार आहे. दि. 13 मार्च रोजी प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजल्यानंतर मूर्ती अभिषेक करता येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content