Monday, October 28, 2024
Homeबॅक पेजहैदराबादनजीक गुरूवारपासून होणार...

हैदराबादनजीक गुरूवारपासून होणार जागतिक अध्यात्म महोत्सव

केंद्रीय संस्कृती मंत्रालय (विशेष विभाग) आणि हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने येत्या 14 ते 17 मार्चदरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव नावाची एक विशिष्ट आध्यात्मिक परिषद आयोजित करणार आहेत. ही परिषद हैदराबाद शहराच्या बाह्यवर्ती भागात असलेल्या हार्टफुलनेस संस्थेचे मुख्यालय, कान्हा शांती वनम येथे आयोजित करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ध्यान केंद्रात आयोजित या परिषदेत सर्व धर्म आणि पंथाचे आध्यात्मिक नेते एकत्र जमणार आहेत.

हैदराबाद येथे काल आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या जागतिक अध्यात्म महोत्सवाची माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड अनुक्रमे 15 आणि 16 मार्चला या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.

या चार दिवसीय अध्यात्म शिखर परिषदेची मुख्य संकल्पना “आंतरिक शांती ते जागतिक शांती” अशी आहे. या परिषदेचे उद्दिष्ट आंतरधर्मीय संवाद घडवून आणणे आणि प्रत्येक वयोगटातील आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांना दैनंदिन जीवनात अध्यात्माशी जोडण्यास मदत करणे हा आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि जगाला प्रेरणा देणाऱ्या जीवनशैलीचा दर्शक आहे. आपण आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगासमोर मूर्तीमंत उदाहरण म्हणून उभे आहोत आणि सोबतच जगाची आध्यात्मिक राजधानी बनलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत 100,000हून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या शिखर परिषदेमध्ये विविध गटांमध्ये चर्चा, अध्यात्माशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, भारताचा अध्यात्मिक इतिहास, शांती कथा  तसेच पुस्तके आणि संगीताच्या माध्यमातून अध्यात्माचा एक मंत्रमुग्ध अनुभव दाखवणारे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. ज्यांना तंदुरुस्तीसाठी आणि उपचारात्मक सत्रांचा लाभ घेण्याची इच्छा आहे अशा सहभागींसाठी पंचकर्म केंद्रेदेखील स्थापन केली जाणार आहेत, असेही रेड्डी म्हणाले.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या संस्था

रामकृष्ण मिशन, परमार्थ निकेतन, आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन, द माता अमृतानंदमयी मठ, हैदराबादचे आर्चबिशप, रेव्हरंड कार्डिनल अँथनी पूल, चिन्ना जियार स्वामी, ब्रह्मा कुमारी, पतंजली योगपीठ, महर्षि फाऊंडेशन (ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन), ईशा फाऊंडेशन, इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (आयबीसी), शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, हैद्राबादचे आर्कडायोसेस, राष्ट्र संत तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर देवस्थान, अखिल भारतीय इमाम संघटना, श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर आणि श्री रामचंद्र मिशन किंवा हार्टफुलनेस.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content