Homeबॅक पेजडॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने पटकावली घोष ट्रॉफी!

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी सहज पराभव करून चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अधिकृत स्पर्धेमध्ये आठ संघांचा सहभाग होता. स्पोर्टिंग युनियन, कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॅशिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली. पण काही वेळातच उण्यापुऱ्या २० धावांवर त्यांनी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर खुशीच्या खेळीमुळे त्यांना ५ बाद १३६ धावांचा पल्ला गाठता आला. खुशीने बचाव आणि आक्रमण यांचा मिलाफ साधत ४५ चेंडूत ६० धावा काढल्या. त्यात तिने ८ चौकार मारले. तिने ईशिका जगताप (२२) हिच्यासह चौथ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

प्रथम दर्शनी काहीशी कमी वाटणारी डॅशिंगची धावसंख्या मग फारच मोठी भासू लागली. कारण एमआयजीचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे धावगतीपण मंदावली. डॅशिंगच्या श्रेया सुरेशने १३व्या षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेत एमआयजीची ७ बाद ६१ अशी अवस्था करताच विजेतेपदाचा निकाल लागून गेला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम राऊत, युरोपेमचे कंट्रीहेड बी. सी. पटेल तसेच एमसीएचे अभय हडप यांच्या हस्ते संपन्न झाला.

संक्षिप्त धावफलक

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबः २० षटकांमध्ये ५ बाद १३६ (खुशी निजाई नाबाद ६०, ईशिका जगताप २२, हर्षी पुरस्नानी १७/३, ख्याती स्वेन २०/२)

विजयी विरुद्ध

एमआयजी क्रिकेट क्लबः १९.५ षटकात सर्वबाद ८८ (हिर कोठारी १९, श्रेया सुरेश १८/४)

सामन्यात सर्वोत्तमः श्रेया सुरेश

स्पर्धेत सर्वोत्तमः महेक मिस्त्री (एमआयजी)

सर्वोत्तम फलंदाजः रिया पवार (युरोपेम)

सर्वोत्तम गोलंदाजः त्रिशा नायर (डॅशिंग)

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूः किंजल कुमारी (साईनाथ)

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content