Friday, January 3, 2025
Homeमुंबई स्पेशलकचरा उचलण्यासाठी लवकरच...

कचरा उचलण्यासाठी लवकरच ‘डी’ विभागातही ई ऑटो रिक्षा!

मुंबईत घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने ई ऑटो रिक्षांचा पर्याय अवलंबला आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘एम पूर्व’ विभागात राबवलेल्या ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे कचरा संकलन सोपे होतानाच वाहतुकीसाठी आणि पर्हीयावरणासाठीही हा पर्याय सोयीचा ठरत आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन रिक्षांचा वापर करण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. लवकरच डी विभागातदेखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे.

घरगुती कचरा संकलनावर भर देतानाच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेसाठी ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच अतिशय दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर सुरु करण्यात आला. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी काही भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

‘एम पूर्व’ विभागात गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई ऑटो रिक्षांचा वापर करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार तीन ई ऑटो रिक्षांचा वापर सध्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात येत आहे. 

‘ई ऑटो रिक्षा’च्या माध्यमातून कचरा संकलन करणे हे पालिकेला जसे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी सोयीचे झाले आहे, तसे नागरिकांना देखील कचरा टाकणे हे सोयीचे ठरत आहे. नागरिकांच्या घरानजीक ‘ई ऑटोरिक्षा’मध्ये कचरा टाकण्याची सुविधा झाल्याने इतरत्र टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. गल्लीबोळातही या ऑटोरिक्षा सहजपणे जात असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येवरही हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. घरोघरी कचरा संकलनासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणानुसार झोपडपट्टीबहुल परिसरात कचरा संकलनाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट घनकचरा विभागाने ठेवले आहे. त्यानुसार आणखी तीन ‘ई ऑटो रिक्षा’ या भागासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.

फायदे ई ऑटो रिक्षाचे

‘ई व्हेईकल’मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत असल्याने कोणतेही इंधन ज्वलनाची प्रक्रिया या वाहनांसाठी होत नाही. परिणामी कार्बन उत्सर्जन होत नाही. ई वाहने चार्जिंग करण्यासाठी चौकीच्या ठिकाणी सहज वापराचा पर्याय आहे. तसेच या वाहनांपासून कोणताही आवाज निर्माण होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या मोटरसाठी देखभाल आणि दुरूस्तीचा येणारा खर्च तुलनेत कमी आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या शाल्मली जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य.  वि. भातखंडे यांच्या वतीने पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत येत्या रविवारी,  ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना...

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षांखालील इयत्ता १०वीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा येत्या १० व ११ जानेवारीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी...

“स ला ते स ला ना ते”चे पोस्टर निसर्गाच्या सानिध्यात लॉन्च!

कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला 'स ला ते स ला ना ते' हा 'नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट' अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे...
Skip to content