बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान एच पश्चिम प्रभागातील वांद्रे पाली हिल, खार भागातल्या खालील नमूद भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
एच पश्चिम विभागातील पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्गालगतच्या झोपडपट्टया, गझधर बंध भाग, दांडपाडा, १६ वा रस्ता व २१ वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेचा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ नंतर एच पश्चिम प्रभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती पालिका प्रशासनाने केली आहे.