Homeटॉप स्टोरीआनंदाचा शिधा मिळणार...

आनंदाचा शिधा मिळणार राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त लोकांना

अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे. यानिमित्त राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधाचे वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

शिधा

आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022च्या दिवाळी सणानिमित्त, सन 2023च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात आला.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content