Homeमुंबई स्पेशल२० जानेवारीला पं....

२० जानेवारीला पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारीला संघर्ष सदन हॉल, म्हाडा संकुलाजवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम), मुंबई-४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या  रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.

भरतीइच्छुक नियोक्ते यांनी जास्तीतजास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर “Pandit Dindayal Upadhyay Job Fair” ऑप्शनवर क्लिक करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसूचित करावी व २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहवे. याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

या मेळाव्याचा जास्तीतजास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहरचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content