Homeटॉप स्टोरीजीएसटी तपासयंत्रणांना सापडल्या...

जीएसटी तपासयंत्रणांना सापडल्या 29 हजार बोगस कंपन्या!

जीएसटी संदर्भातील विविध यंत्रणांकडून मे 2023च्या मध्यात बनावट नोंदणी विरोधात विशेष मोहीम सुरू झाल्यापासून, 44, 015 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चुकवल्याचा संशय असलेल्या एकूण 29,273 बोगस कंपन्या सापडल्या आहेत. यामुळे 4,646 कोटी  रुपयांची बचत झाली आहे. त्यापैकी 3,802 कोटी  रुपयांची बचत, आयटीसी रोखून धरत आणि 844 कोटी रुपयांची बचत, वसुलीच्या माध्यमातून झाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 121 जणांना अटक करण्यात आली आहे.

वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) घोटाळे रोखण्यासाठी आणि अनुपालन वाढविण्यासाठी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या अंतर्गत देशभरात, जीएसटी संबंधितांकडून मोहीम राबवली जात आहे. अस्तित्त्वात नसलेल्या/बोगस नोंदी आणि वस्तू-सेवांचा कोणताही मूलभूत पुरवठा न करता बनावट पावत्या जारी करणाऱ्यांवर, ही मोहीम लक्ष केंद्रित करत आहे.

डिसेंबर 2023च्या अखेरच्या तिमाहीत,  12, 036 कोटी रुपयांचे आयटीसी चुकवल्याचा संशय असलेल्या 4,153 बोगस कंपन्या सापडल्या आहेत. यापैकी 2,358 बोगस कंपन्या केंद्रीय जीएसटी प्राधिकरणाने शोधून काढल्या आहेत. यामुळे 1,317 कोटी रुपयांचा महसूल वाचला आहे. त्यापैकी, वसुलीतून मिळालेली रक्कम 319 कोटी रुपये एवढी, तर आयटीसी रोखून वाचलेली रक्कम 997 कोटी रुपये एवढी आहे.  याप्रकरणी 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 31 जणांना केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. राज्यनिहाय तपशील उपलब्ध  आहेत.

जीएसटी नोंदणी प्रक्रिया मजबूत करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. नोंदणीच्या वेळी बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरणाचे प्रायोगिक प्रकल्प, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आले आहेत.

जीएसटी

याव्यतिरिक्त, जीएसटी विवरणपत्रे अनुक्रमे दाखल करणे, जीएसटीआर-1 आणि जीएसटीआर-3 बी मधील कर दायित्वातील तफावत दूर करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, जीएसटीआर-2B आणि जीएसटीआर-3Bनुसार उपलब्ध असलेल्या आयटीसीमधील तफावत कमी करणे, विदा विश्लेषणाचा वापर आणि बनावट आयटीसी शोधण्यासाठी जोखीम मापदंड यासारख्या उपाययोजनांद्वारे, सरकारने  कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा  प्रयत्न केला आहे.

Action against bogus firms during Quarter ending in December 2023

Name of the State/UTNumber of bogus firms detected Tax Evasion suspected (Rs Cr.)ITC amount blocked / recovered ( Rs Cr.)Arrests Made Fake firms per lakh registered firms 
Andhra Pradesh197651105
Arunachal Pradesh0131400
Assam191166708
Bihar301488805
Chandigarh25106
Chhattisgarh268334115
Dad. & Ngr Haveli00000
Delhi4833028901161
Goa429009
Gujarat 17844525315
Haryana42462476381
Himachal Pradesh414403
J&K31002
Jharkhand231102011
Karnataka22339759222
Kerala421524010
Ladakh00000
Madhya Pradesh7015822113
Maharashtra92622011021154
Manipur00000
Meghalaya05000
Mizoram00000
Nagaland00000
Odisha1383377042
Puducherry22008
Punjab82754121
Rajasthan50719731159
Sikkim222018
Tamil Nadu185494374116
Telangana117536235123
Tripura9200029
Uttar Pradesh443164544524
Uttarakhand66880033
West Bengal12634318017
And. & Nicobar Is00000
Lakshadweep00000
Total41531203613174129

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content