Homeटॉप स्टोरीधुक्यातल्या रेल्वेसेवेसाठी 19,742...

धुक्यातल्या रेल्वेसेवेसाठी 19,742 फॉग पास उपकरणे!

हिवाळ्यामधील धुक्याच्या वातावरणामुळे दरवर्षी विशेषतः देशाच्या उत्तरेकडेच्या भागातील रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. धुक्याच्या हवामानात रेल्वेसेवा सुरळीत ठेवण्यासाठी, भारतीय रेल्वेने 19,742 फॉग पास डिव्हाइस, अर्थात धुके भेदून जाणाऱ्या उपकरणांची तरतूद केली आहे. हा उपक्रम रेल्वेसेवेची विश्वासार्हता वाढवण्याच्या, विलंब कमी करण्याच्या आणि प्रवाशांची एकूण सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

फॉग पास डिव्हाइस हे एक जीपीएस आधारित दिशादर्शक उपकरण आहे, जे लोको पायलटला (चालक) दाट धुक्याच्या परिस्थितीत मार्ग शोधायला मदत करते. हे उपकरण हे लोको पायलट्सना, सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट (मानव आणि मानवरहित), कायमस्वरूपी वेग प्रतिबंधक, तटस्थ विभाग, ई. यासारख्या स्थिर खुणांच्या स्थळांची प्रत्यक्ष अद्ययावात माहिती (दृश्य आणि ध्वनीच्या स्वरूपातील मार्गदर्शन) प्रदान करते. हे उपकरण, व्हॉईस मेसेजसह  भौगोलिक क्रमाने, अंदाजे 500 मीटर अंतरावर समोर येणाऱ्या पुढील तीन निश्चित लँडमार्क्सची (स्थिर खुणांची) आगाऊ सूचना देते.

रेल्वे

विभागीय रेल्वेसाठी तरतूद केलेल्या फॉग पास उपकरणांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

S.No.Zonal RailwaysNumber of Devices provisioned
1Central Railway560
2Eastern Railway1103
3East Central Railway1891
4East Coast Railway375
5Northern Railway4491
6North Central Railway1289
7North Eastern Railway1762
8Northeast Frontier Railway1101
9North Western Railway992
10South Central Railway1120
11South Eastern Railway2955
12South East Central Railway997
13South Western Railway60
14West Central Railway1046
Total19742
रेल्वे

फॉग पास डिव्हाइसची सामान्य वैशिष्ट्ये:

• सिंगल लाईन, डबल लाईन, इलेक्ट्रीफाईड तसेच नॉन इलेक्ट्रीफाईड विभाग, यासारख्या सर्व प्रकारच्या विभागांसाठी योग्य.

• सर्व प्रकारच्या वीज आणि डिझेल वरील इमू/मेमू.डेमू गाड्यांसाठी योग्य.

• 160 KMPHपर्यंत गाडीच्या वेगासाठी योग्य.

• 18 तास चालणार्‍या अंतर्भूत री-चार्जेबल बॅटरीची सुविधा.   

• पोर्टेबल (हलवता येण्याजोगे), आकाराने कॉम्पॅक्ट (लहान), वजनाने हलके (बॅटरीसह 1.5 कि.पेक्षा जास्त नाही) आणि मजबूत डिझाइन.

• लोको पायलटना आपली ड्युटी सुरू होताना रेल्वेगाडीत हे उपकरण सहज नेता येते.

• लोकोमोटिव्ह च्या कॅब डेस्कवर सहजपणे ठेवता येते.

• ही एक स्वतंत्र प्रणाली आहे.

• धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाश यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे ते प्रभावित होत नाही.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content