Homeन्यूज अँड व्ह्यूजमतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही...

मतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही धागे सापडतात!

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात एका मच्छिमाराची कथा आहे ज्याचे कणखर व्यक्तिमत्व आहे आणि दुरावलेल्या मुलीशी त्याची झालेली भेट याचे चित्रण आहे, असे ‘द फिशरमन्स डॉटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम म्हणाले.

54व्या इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शक जेकोम यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. मच्छीमार वडील आणि त्याची दुरावलेली मुलगी पुन्हा एका निर्जन बेटावर भेटतात आणि ते त्यांच्या त्रासदायक भूतकाळ आणि वर्तमानाशी जुळवून घेतात, असे सांगत एदगार यांनी चित्रपट निर्मितीप्रती त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांच्या सिनेमॅटिक कल्पनाशक्तीला चालना देणारे घटकदेखील सामायिक केले. त्यांचे आजोबा एक मच्छिमार होते आणि त्यांचे जीवन या चित्रपटासाठी प्रेरक ठरले, असेही ते म्हणाले.

या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पर्यटन, बंदरे आणि इमारतींमुळे सांता मार्ताचे मच्छिमार विस्थापित झाले आणि त्याचप्रमाणे ट्रान्स समाजालाही हलविण्यात आले. या चित्रपटाची कल्पना या दोन्ही समुदायांना एका कथेत जोडणे आणि एकत्र आणणे ही आहे”.

‘द फिशरमन्स डॉटर’ या चित्रपटाद्वारे एदगार र डी लुके जेकोम पदार्पण करत आहे आणि मच्छिमार आणि ट्रान्स समुदाय या दोघांचा अनोखा दृष्टीकोन यात पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. एदगर डी लुके जेकोमचा लघुपट सिन रेग्रेसो (2007) बियारिट्झ आणि सॅंटियागो येथील महोत्सवांमध्ये होता. त्याने युनिव्हर्सिडॅड डेल नॉर्टे येथे कम्युनिकेशन्समध्ये प्रावीण्य मिळवले आणि रॉबर्टो फ्लोरेस प्रिएटो यांच्या रुइडो रोसा (2014) आणि लिबिया स्टेला गोमेझ यांच्या एला (2015)मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते. त्याच्या तीन पटकथांसाठी एफडीसीचे पटकथालेखन उत्तेजनपर पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. ते अनेक वर्षे युनिव्हर्सिडॅड डेल मॅग्डालेना येथे प्राध्यापक होते.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content