Homeमुंबई स्पेशलसणासुदीच्या काळासाठी 'बॉडी...

सणासुदीच्या काळासाठी ‘बॉडी शॉप’चे खास पाउचेस!

हा सणासुदीचा काळ आणखी विशेष करण्यासाठी द बॉडी शॉप इंडियाने वैशिष्ट्यपूर्ण रिसायकल्ड कॉटन गिफ्ट पाउचेस आणली आहेत. यामध्ये ग्राहक त्यांना आवडतील त्या वस्तू भरू शकतात. द बॉडी शॉपचा भारतातील पहिला कम्युनिटी फेअर ट्रेड पार्टनर टेडी एक्स्पोर्ट्सने हे पाउचेस कौशल्याने तयार केले आहेत.

गेल्या पाच दशकांपासून द बॉडी शॉप आणि नीतीमत्तापूर्ण भेटवस्तू असे समीकरण चालत आले आहे. त्यांच्या भेटवस्तू या केवळ वस्तू नसतात, तर आशेचे प्रतीक असते. कम्युनिटी फेअर ट्रेड पार्टनर्सकडून आलेल्या घटकांनी किंवा पॅकेजिंगने समृद्ध असलेल्या या भेटवस्तूंमध्ये देण्याचे चैतन्य सामावलेले असते. प्रत्येक खरेदीसह आपण केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींप्रतीच नव्हे, तर जगभरातील समुदायांप्रती प्रेम व्यक्त करू शकतो.

त्यातील प्रत्येक पाउचमध्ये तेथे काम करणाऱ्या स्त्रियांच्या प्रगतीच्या अविश्वसनीय कहाण्या आहेत. टेडी एक्स्पोर्टस् ६००हून अधिक व्यक्तींना केवळ चांगले उत्पन्नच नव्हे, तर अर्थपूर्ण रोजगारही पुरवते. मुरुगेस्वरी यांच्यासारख्या कारागीर त्यातून आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतात किंवा कस्तुरी अनुकूल वातावरणात शिवणकामाचे शिक्षण यामुळे घेऊ शकतात.

द बॉडी शॉप दक्षिण आशियाच्या मार्केटिंग, ई-कॉमर्स व प्रोडक्ट विभागाचे उपाध्यक्ष हरमीत सिंग म्हणतात की, आम्ही हा व्हिडिओ जगासोबत शेअर करत असताना, सर्वांनी द बॉडी शॉपची स्पंदने अनुभवावीत अशी आमची इच्छा आहे. ‘स्पार्क अ चेंज’ हा आमच्यासाठी भावनात्मक व प्रेरणादायी प्रवास आहे. आम्ही जोडत असलेल्या संबंधांचा, आम्ही स्पर्श करत असलेल्या आयुष्यांचा आणि एकत्रितपणे घडवून आणू बघत असलेल्या सकारात्मक बदलाचा हा प्रवास आहे.

टेडी एक्स्पोर्टसच्या ऑपरेशन्स समन्वयक तारा मर्फी सांगतात की, द बॉडी शॉपसोबत ३५ वर्षांहून अधिक काळ काम केल्याचा टेडी एक्स्पोर्टसला खूपच अभिमान वाटतो. सणासुदीच्या उत्साहाचे चैतन्य सामावलेल्या रिसायकल्ड सुती भेटवस्तू तयार करण्यासाठी आमचे कारागीर खूप परिश्रम घेतात. द बॉडी शॉपसोबत आम्ही केवळ पाउचेस तयार करत नाही आहोत, तर सर्वांसाठी अधिक उज्ज्वल, अधिक आशावादी भविष्यकाळ घडवत आहोत.

पुढील बदलाला चेतना देण्यात मदत म्हणून द बॉडी शॉप इंडियाने एक देणगी अभियान सुरू केले आहे. यात ग्राहकांना, २०२३ सालाच्या अखेरीपर्यंत प्रत्येक खरेदीसोबत १० रुपयांची देणगी देऊन टेडी ट्रस्टच्या आद्य प्रकल्पांना मदत करण्यासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत.

पाउचेस

‘स्पार्क अ चेंज’ अभियानाला एका नवीन फिल्मची जोड देण्यात आली आहे [https://youtu.be/Q-sfH_QE7S4?si=gkGNVUcOl1DS0oAg]. यामध्ये टेडी एक्स्पोर्टच्या कुशल महिला सणासाठी आकर्षक गिफ्ट पाउचेस हाताने तयार करत आहेत. या भेटवस्तू द बॉडी शॉपने सणासुदीसाठी खास तयार करवून घेतल्या आहेत.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content