पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामासाठी आज, सोमवार दि. २० नोव्हेंबर ते शनिवार, २ डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व विभागांत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार असून ते २ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोमवार, दि. २० नोव्हेंबर २०२३ ते शनिवार, दि. २ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुंबई महानगरात तसेच मुंबई महापालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरातील सर्व नागरिकांनी वरील कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.