Homeचिट चॅटसीमेवरील १५ हजार...

सीमेवरील १५ हजार सैनिकांना ‘अनाम प्रेम’चा दिवाळी फराळ!

सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या “अनाम प्रेम” परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज सभागृहात फराळ तयार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

आपल्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढतात, बलिदान करतात याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लेह, लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू- काश्मीर, पंजाब-अमृतसर या सीमावर्ती भागात फराळ पाठविण्यात आला आहे. काही ठिकाणी नाविक दल आणि हवाई दलाच्या सैनिकांनाही हा फराळ पाठविण्यात आला आहे.

सीमेवरील सैनिकांना फराळ पाठविण्याचे हे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. केवळ सैनिकच नव्हे तर पोलीस, बेस्टचे वाहक-चालक, अनाथ मुले, देहविक्रय करणार्‍या निराधार महिला, रुग्णालयातील परिचारिका अशा विविध वर्गातील कर्मचार्‍यांना “अनाम प्रेम”चे प्रेम लाभले आहे.

“प्रेम शिंपित जा” या बोधवाक्याला अनुसरून परिवाराचे सर्व कार्यकर्ते मुंबई-महाराष्ट्राच्या विविध भागात हे कार्य करीत असतात. गेल्या वीस वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, आणि यापुढेही असेच सुरू राहणार आहे, अशी माहिती “अनाम प्रेम” च्या हिमा नगरे (भ्रमणध्वनी – ९८७००९०९९४) यांनी दिली.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content