Homeब्लॅक अँड व्हाईटदुसऱ्या तिमाहीत टीसीआयच्या...

दुसऱ्या तिमाहीत टीसीआयच्या नफ्यात 16.7% वाढ!

भारतातील आघाडीची एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स समाधान पुरवणारी कंपनी टीसीआय लिमिटेडने ३० सप्‍टेंबर २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या आर्थिक वर्ष २४च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीच्‍या या तिमाहीतील एकूण महसुलामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ६.२ टक्के वाढ झाली, तर नफ्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्‍या तुलनेत १६.७ टक्के वाढ झाली.

टीसीआयचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्‍हणाले, कंपनीने आर्थिक वर्ष २४ च्‍या दुसऱ्या तिमाहीसाठी व पहिल्‍या सहामाहीसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली. ऑटोमोटिव्‍ह, इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर, इंजीनिअरिंग व ग्राहकोपयोगी वस्‍तू अशा प्रमुख विभागांना उत्तम प्रतिसाद मिळाला. सणासुदीचा काळ सुरू असल्‍यामुळे व्‍यवसायाच्‍या आकारमानामध्‍ये अपेक्षांप्रमाणे वाढ दिसण्‍यात आली आहे. आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की, टीसीआय ग्रुपला नुकतेच आयोजित करण्‍यात आलेल्‍या ग्‍लोबल मेरिटाइम इंडिया समिट २०२३ येथे शिपिंग – प्रमोटिंग मल्‍टीमोडल लॉजिस्टिक्‍स’मध्‍ये मेरिटाइम एक्‍सलन्‍स अचीव्‍हर म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

स्वतंत्र परिणाम:

आर्थिक वर्ष २०२४ च्या दुस-या तिमाहीमध्ये कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल ९,१२० दशलक्ष रुपये झाला ज्‍यामध्‍ये वार्षिक ६.२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३ मधील ९९२ दशलक्ष रुपयांच्या तुलनेत ईबीआयटीडीए १,०८६ दशलक्ष झाला. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील ११.६ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ११.९ टक्‍के आणि ३.१ टक्‍क्‍यांनी वाढले. आर्थिक वर्ष २०२३ मधील ५७४ दशलक्ष रुपयांच्या तुलनेत कंपनीचा पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २०२४ च्या दुस-या तिमाहीमध्ये १६.७ टक्क्यांच्या वाढीसह ६७० दशलक्ष रुपये झाला. पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील ६.७ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ७.४ टक्‍के आणि ९.९ टक्‍क्‍यांनी वाढले. 

एकत्रित परिणाम: 

आर्थिक वर्ष २०२४ ची पहिल्या सहामाहीमध्ये कार्यसंचालनांमधून महसूल १९,६३१ दशलक्ष रुपये झाला ज्‍यामध्‍ये वार्षिक ६.२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२३ मधील २,३६३ दशलक्ष रुपयांच्या तुलनेत २,५८६ दशलक्ष रुपये झाले. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील १२.८ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १३.२ टक्‍के आणि ३ टक्‍क्‍यांनी वाढले. पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २०२३ मधील १,५१६ दशलक्ष रुपयांच्या तुलनेत १,७१० दशलक्ष रुपये आणि १२.८ टक्‍क्‍यांनी वाढले. पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील ८.२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ८.७ टक्‍के आणि ६.२ टक्‍क्‍यांनी वाढले.

टीसीआयने जवळपास ३०० कोटी रूपयांच्‍या करार किंमतीसाठी प्रत्‍येक अंदाजे ७३०० मेट्रिक टन डीडब्‍ल्‍यूटीच्‍या दोन सेल्‍युलर कन्‍टेनर वेसेल्‍स निर्माण करण्‍याकरिता जपानी शिपयार्डसोबत निश्चित करार केला. या जहाजांची डिलिव्‍हरी आर्थिक वर्ष २६ मध्‍ये करण्‍यात येईल. जहाजे व ट्रेन्‍समधील गुंतवणूक ग्राहकांना मल्‍टीमोडल व हरित लॉजिस्टिक्‍स प्रदान करण्‍याच्‍या आमच्‍या उद्देशाशी संलग्‍न आहे.

Continue reading

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...
Skip to content