Friday, November 8, 2024
Homeएनसर्कलजाचक फी वसुलीचा...

जाचक फी वसुलीचा भार हलका होणार?

कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षणशुल्क, फी वसुली करत आहेत. ही जाचक फी वसुली 50 टक्के कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्त्वाखाली लावून धरली आहे.

याप्रश्नी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत राज्य सरकारने शाळा, कॉलेज, अगदी केजी to पीजी स्तरावर शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करावे, कोरोना संकटात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. जयंत पाटील यांनी याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शाळा, कॉलेजचे शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रश्नी तोडगा न निघाल्यास मंत्रालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अमोल मातेले यांनी दिला. जर हा प्रश्न सुटला नाहीतर मीदेखील आपल्यासोबत आंदोलनात उतरेन, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला असल्याचे मातेले यांनी सांगितले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content