Friday, October 18, 2024
Homeडेली पल्स"द प्रॉब्लेम ऑफ...

“द प्रॉब्लेम ऑफ द रुपी”चा शताब्दी वर्ष सोहळा उद्या!

उद्या, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतल्या नरीमन पॉईंटमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICEद्वारे आयोजित हा सोहळा स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

भारतीय रिजर्व्ह बँक, भारतीय बँक व्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय योगदानास अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमात अमेरिकेच्या प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठासह SOAS युनिव्हर्सिटी लंडन नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होत आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सद्वारे बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील अमेरिका आणि लंडन येथील कालावधी, त्यांचे कार्य यावर एक सादरीकरण सादर केले जाणार आहे. कोलंबिया विद्यापीठामार्फत आंबेडकराचे कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्य आणि जडणघडणीची प्रक्रिया सादरीकरण करुन आंदराजली अर्पण केली जाणार आहे.

या कार्यक्रमात मान्यवर वक्ते शरद पवार, बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह कुमार केतकर, सुप्रिया सुळे आणि इतर वक्ते बाबासाहेबांच्या आर्थिक योगदानाच्या प्रवासाचा मागोवा घेतील. नामवंत अर्थतज्ज्ञ प्रा. स्वाती वैद्य, डॉ. मनिषा करणे, डॉ. अजित रानडे, डॉ. जयती घोष, डॉ. वामन गवई आणि डॉ. गणेश देवी आंबेडकरांच्या भरीव आर्थिक योगदानावर प्रकाश टाकतील. या कार्यक्रमात न्यायमूर्ती सी. एल. थूल आणि डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते नवीन पिढीतील उद्योजक अविचल धिवार, भरत वानखेडे, निलेश पठारे, अक्षय दावडीकर, आणि विशाल पाटणकर यांना सन्मानित केलं जाईल.

विशेष म्हणजे उरूवेला या प्रकाशन संस्थेतर्फे बा भीमा, या कॉमिक बुक सिरीजचा चौथा भाग प्रकाशित केला जाणार असून यात भागात डॉ. आंबेडकरांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात सदर ग्रंथ लिहितानाचा संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. तसेच बाबासाहेबांच्या जडणघडणीत ज्या महामानवाची मोलाची भूमिका होती त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या आयुष्यावरील पहिलंवहिलं कॉमिक बुकदेखील या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात विक्रांत भिसे, भूषण भोंबाळे, मयुरी च्यारी, लक्ष्मण चव्हाण, प्रभाकर कांबळे, सुरज कांबळे, आकांक्षा धनराज पाटील, सुधीर राजभर, पिसुर्वो जितेंद्र सुरळकर आणि क्युरेटर- सुमेश मनोज शर्मा या भारताच्या आघाडीच्या दृष्यचित्रकारांद्वारे विशिष्ट पद्धतीच्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांना व त्यांच्या आर्थिक योगदानास आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने आज आपल्या देशाच्या आर्थिक उन्नतीचे प्रतीक म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रूपी आणि बाबासाहेबांचे अर्थशास्त्र साजरं करण्यासाठी शताब्दी उत्सव आयोजित करण्यात आला आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

1. विजय गायकवाड- +91 9702064951

2. महेश घोलप- +91 9870447750

3. वैभव छाया- +91 8149752712

कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी लिंक:

http://bit.ly/100tpr

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content