कोविड-19च्या मध्यम तसेच तीव्र स्वरूपाच्या रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवरील उपचारासाठी डीआरडीओने विकसित केलेले 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी), हे औषध वापरात आणले जात असतानाच रूग्णालयात दाखल न झालेल्या लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड रूग्णांवरील उपचारांसाठी आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर, या औषधांचा मारा करण्याचे धोरण आयुष मंत्रालयाने हाती घेतले आहे.
देशातील कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना आयुष मंत्रालयाने रुग्णालयाबाहेरील (रूग्णालयात दाखल करण्याची गरज नसलेल्या) बहुसंख्य कोविड रुग्णांच्या हितासाठी आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर ही बहु-वनौषधीयुक्त आयुर्वेदिक औषधे वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.
या औषधांची कार्यक्षमता बहु-केंद्रीय क्लिनिकल चाचण्याद्वारे सिद्ध झाली आहे. आयुष मंत्री (अतिरिक्त प्रभार) किरेन रिजिजू यांच्या हस्ते राबवण्यात येणारी ही बहुपक्षीय मोहीम पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवणे सुनिश्चित करेल. सेवा भारती या मोहिमेत मुख्य सहयोगी आहे.

मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून वितरणाचे व्यापक धोरण आखण्यात आले असून ते टप्प्याटप्प्याने राबवले जाईल आणि सेवा भारतीच्या देशभरातील नेटवर्ककडून यासाठी मदत पुरवली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोविड-19चा देशभरात उद्रेक झाल्यापासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाबरोबर एकत्र काम करताना आयुष मंत्रालयाने कोविड-19चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
आयुष मंत्रालयाने कोविड-19चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी धोरण आखण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका आंतरशाखीय आयुष संशोधन आणि विकास कृती दलाची स्थापना केली आहे. सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक विज्ञान (सीसीआरएएस)ने विकसित केलेल्या आयुष-64 आणि काबासुरा कुडीनीर या शास्त्रीय सिद्ध औषधाबाबत विविध प्रकारे अभ्यास करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) सहकार्याने कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापनात आयुष 64च्या सुरक्षिततेचे व कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अलिकडेच बहुकेंद्रीय क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. आयुष मंत्रालयांतर्गत केंद्रीय सिद्ध संशोधन मंडळाने (सीसीआरएस) कोविड-19 रुग्णांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी काबासुरा कुडीनीर या सिद्ध औषधाच्या क्लिनिकल चाचण्यादेखील करण्यात आल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोविड-19 संसर्गावरील उपचारातही उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
ह्या औषधांचा मारा करण्याचे धोरण ठरविले आहे, ह्याचा अर्थ काय होतो,?