Friday, September 20, 2024
Homeकल्चर +उद्यापासून आनंद लुटा...

उद्यापासून आनंद लुटा सत्यजीत रे यांच्या दुर्मिळ चित्रपटांचा!

भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय आतापर्यंतच्या ज्या काही मोजक्या महान चित्रपट निर्मात्यांना मिळाले आहे, त्यापैकी एक म्हणजे सत्यजित रे. खऱ्या अर्थाने नवनिर्मिती करणारा मनुष्य. रे यांनी आपल्या काव्यात्मक, वास्तववादी आणि चित्रपटाच्या कल्पनांनी चित्रपट कलेसाठी जगभरात ख्याती मिळविली.

चित्रपटांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सत्यजित रे यांची जन्मशताब्दी यंदा वर्षभर साजरी केली जात आहे. या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त फिल्म्स डिव्हिजन, रे यांच्यावरील चित्रपटांसह कलासाहित्य, संगीत क्षेत्रातील निर्मिती असलेल्या कथाबाह्य कलाकृती यांचा संच असलेलला ‘रे टुडे’ हा ऑनलाईन चित्रपट महोत्सव सादर करीत आहे. हा महोत्सव 7 ते 9 मे 2021 या कालावधीत फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर विनामूल्य दाखविला जाईल.

रे टुडे’ महोत्सवात, सत्यजित रे यांनी नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्यावर तयार केलेला एक दुर्मिळ माहितीपट, मुन्शी प्रेमचंद यांच्या लघुकथा असलेला रे यांचा एकमेव दूरचित्रवाणी चित्रपट आणि श्याम बेनेगल यांचा बहुचर्चित, रे यांच्याविषयीचा काल्पनिक चरित्रपट यांचा समावेश आहे.

या महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट खालीलप्रमाणे:

सद्गती (सत्यजित रे / दूरदर्शन / 52 मिनिटे / 1981)- ग्रामीण भारतावर आधारित एक दूरचित्रवाणी चित्रपट जो समाजातील जातीव्यवस्थेवर प्रकाश टाकतो.

टू (सत्यजित रे / एसो वर्ल्ड थिएटर / 15 मिनिटे / 1964)- वर्ग संघर्षावरील एक सामान्य पण कठोर सामाजिक भाष्य करणारा म्हणजे श्रीमंत कुटूंबातील मुल आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलामधील संघर्ष दाखवणारा आणि त्यांच्या खेळण्यांमधून मुलांमधील एकप्रकारची कुरघोडी दर्शवणारा.

पिकू (सत्यजित रे / फ्रेंच टेलिव्हिजन / 24 मिनिटे / 1980)- सहा वर्षांच्या मुलाची एक हृदयस्पर्शी कथा. रे यांनी एका लहान मुलाच्या भवतालच्या जगाचे निष्पापपणे तरीही भावनिक परिणाम करणारे सादरीकरण केले आहे.

रे (गौतम घोष / पश्चिम बंगाल सरकार / 105 मिनिटे / 1999)- 1999मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये प्रशंसनीय ठरलेला एक माहितीपट, केवळ चित्रपट निर्माता याव्यतिरिक्त असलेले रे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व दाखवतो. स्वतः रे यांचा आवाज, त्यांच्या चित्रपटांमधील चित्रफिती आणि अकादमी पुरस्कार सोहळ्याचे क्षण हे याला चरित्रपटापेक्षा माहितीपट बनविणारे असे काही घटक यात आहेत.

सुकुमार रे (सत्यजित रे / पश्चिम बंगाल सरकार / 29 मिनिटे / 1987)- रे यांनी हा चित्रपट त्यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सुकुमार रे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून तयार केला होता.

बाला (सत्यजित रे / एनसीपीए / 33 मिनिटे / 1976)- प्रख्यात भरतनाट्यम नर्तकी, बालसरस्वती यांचे जीवन रेखाटणारा माहितीपट. त्यांच्या नृत्य सादरीकरणाचे हे दुर्मिळ दस्तावेजीकरण आहे.

द इनर आय (सत्यजित रे / फिल्म्स डिव्हिजन / 20 मिनिटे / 1972)- आधुनिक भारतीय कलेच्या प्रणेतांपैकी बनोदबिहारी मुखर्जी यांचे जीवन आणि त्यांचे कार्य दर्शविणारा चित्रपट, ज्यांनी प्रासंगिक आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहात कलात्मक अभिव्यक्ती एक पद्धत म्हणून स्वीकारली.

रवींद्रनाथ टागोर (सत्यजित रे / फिल्म्स विभाग / 54 मिनिटे / 1961)- या माहितीपटात रवींद्रनाथ टागोर या महान बंगाली प्रतिभावंताचे आयुष्य दाखविण्यात आले आहे. यात विश्‍व भारती विद्यापीठाच्या स्थापनेसह टागोरांचे बंगाली साहित्य, कविता आणि चित्रकलेतील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

क्रिएटिव्ह आर्टिस्ट ऑफ इंडियाः सत्यजित रे (बी. डी. गार्गा / फिल्म्स डिव्हिजन /14 मिनिटे/1974)- सत्यजित रे यांच्यावरील प्रारंभीच्या माहितीपटांपैकी एक, ज्यात जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे त्यांच्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचे वर्णन आहे.

सत्यजित रे (श्याम बेनेगल / फिल्म्स डिव्हिजन / 132 मिनिटे /1985)- दोन वर्षांत, प्रख्यात चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी सत्यजित रे यांची त्यांची कारकीर्द आणि चित्रपट निर्मितीमागील त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल मुलाखत घेतली, त्यांनतर चांगले संशोधन झालेला महान व्यक्तिमत्वांवरील चरित्रपट निर्माण झाला.

फेलुदा – 50 इयर्स ऑफ रे डिटेक्टिव्ह (साज्ञीक चटर्जी / 111 मिनिटे / 2019)- फेलू उर्फ प्रदोष चंद्र मित्तर हा भारतातील सर्वात लोकप्रिय काल्पनिक गुप्तहेर आहे जो 2017 साली 50 वर्षांचा झाला. या माहितीपटात फेलूदा चित्रपटांचे साहित्यिक संदर्भ, फेलुदाच्या पडद्यावरील मुलाखती आणि इतर पात्रांचा समावेश आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या परवानगीसाठी तसेच शैक्षणिक संस्था, चित्रपट शाळा आणि संस्था, विभागीय सांस्कृतिक केंद्रे, एमईए आणि अन्य यासारख्या प्रदर्शन भागीदारांच्या मदतीने सत्यजित रे आणि त्यांच्या कार्याचा वारसा देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगभरात नेण्यासाठी सहाय्यकारी ठरलेल्या एनसीपीए, पश्चिम बंगाल सरकार, रे सोसायटी, एससो वर्ल्ड थिएटर, फ्रेंच थिएटर, दूरदर्शन, एनएफडीसी आणि साज्ञीक चटर्जी यांचे योगदान फिल्म डिव्हिजनने या महोत्सवासाठी अधोरेखित केले आहे.

भारतीय सिनेमाचे कवी, रे यांच्या स्वतंत्र कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी https://filmsdivision.org/Documentary यावर लॉग इन करा.

Continue reading

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...
error: Content is protected !!
Skip to content