Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसपरमबीर सिंगांच्या कपाटात...

परमबीर सिंगांच्या कपाटात भ्रष्टाचाराचा सांगाडा?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या हफ्ता मागितला असा सनसनाटी, गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. 2015पासून परमबीर यांनी आपल्यावर सतत कसा अन्याय केला आणि यातून वाचण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्याकडवी लाखो रुपयांच्या दलालीच्या बदल्यात मांडवलीचा प्रस्ताव कसा दिला होता, याची मनोरंजक पण तितकीच संतापजनक माहिती घाडगे यांनी आपल्या 46 पानांच्या विस्तृत तक्रारीत दिली आहे.

खरेतर ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याआधी परमबीर मुंबईत कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली चकमक फेम काही पोलीस अधिकाऱ्यांनी चकमकीचा सपाटा लावलेला होता. तेव्हाच अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. चकमकीत नामचीन गुंड मारले गेले हे सत्य असले तरी दुसऱ्या बाजूस काही खंडणीखोर अधिकारी उदयास आले हेही नाकारता येणार नाही.

“those who fight against corruption should be clean” हे तत्व परमबीर विसरलेले दिसतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे ठाणे आयुक्तालयात निरीक्षकपदी कार्यरत होते. तेथे त्यांना डावलून इतर अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण्यात आले. त्यावेळी ते कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आपल्यावर बढती प्रकरणी अन्याय झाल्याची तक्रार घाडगे यांनी आयुक्त परमबीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

ते दाद देत नाहीत हे पाहून घाडगे यांनी प्रथम मागास आयुक्त व नंतर राज्य अधिकारी निवाडा मंडळाकडे रीतसर निवेदन दिले होते. त्यांनी विचारणा करताच त्यांना घाडगे यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद झाली असल्याचे खोटेच सांगितले गेले. इतकेच नव्हे तर बिल्डरकडे खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा परस्पर नोंदविण्यात आला व चौकशीही सुरू करण्यात आली.

परमबीर

मुळात असा कोठलाच गुन्हा आपण केलेला नाही असे उत्तर घाडगे यांनी दिले. नंतर कागदोपत्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली. माझ्याबरोबर हवालदार किरतकर यांच्यावरही गुन्हा नोंदला गेला. कल्याण विभागात एका बिल्डरने अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यातून वाचवण्यासाठी मी दीड, दोन लाख रुपयांची मागणी केली अशी माझ्या अपरोक्ष तक्रार केली गेली. तक्रारदार माझ्या केबिनमध्ये आले त्याची खोटी चित्रफीतही बनवली गेली. पुढे या प्रकरणाच्या चौकशीत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले.

ती चित्रफीत, इतकेच नव्हे तर मी पैशाची मागणी केलेली नव्हती हे संबधित तक्रारदारांनी स्पष्ट केल्याने परमबीर यांच्या सर्व चौकशीचाच पोपट झाला. परंतु याप्रकरणी मला तब्बल तीन वर्षे मनस्ताप झाला. मला एका गुन्हेगारासारखे वागवले गेले. माझ्या घरीदारीही पोलीस पाठवून माझा अपमान करण्याची एकही संधी परमबीर यांच्या कंपूने सोडली नाही. याउलट परमबीर यांनी काही बिल्डर्सविरुद्ध ठोस पुराव्यांसह केलेल्या अटकेत हस्तक्षेप केला.

इतकेच नव्हे तर श्रीमंत आरोपींना स्वतःच्या अधिकारात सोडून दिले. हा तर पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग असून गैरवर्तनाबद्दल परमबीर यांची कसून चौकशी केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलीस पुस्तकानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. मला निलंबित केल्यानंतर नियमानुसार मला कामावर घेणे क्रमप्राप्त असतानाही सबबी देऊन नेहमीच टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी व मला कामावर रुजू करून घेण्यासाठी एका मोठ्या रकमेचीही मागणी केली गेली.

परमबीर हे पुन्हा खोट्या गुन्ह्यात तसेच खोट्या फौजदारी प्रक्रियेत अडकवतील या भीतीनेच यापूर्वी मी तक्रार केली नव्हती. परमबीर यांचीच कसून चौकशी केल्यास त्यांच्याकडेच काही शेकडो कोटी रुपये सहज मिळतील, असा आरोपही घाडगे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. हे सर्व पत्र वाचत असताना मला बॉलिवूड आणि दक्षिणेतील देमार चित्रपटाची आठवण झाली. तेथेही न आवडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात असते हे आपण पाहतो. आज पुन्हा वात्रटिकाकार रामदास फुटाणे आठवत आहेत..

“2014मध्ये ते काय म्हणाले आठवतंय का?

काय?

आम्ही सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहोत.

हो, आठवतंय..

आज सूर्यग्रहण पाहत आहेत

चंद्र आडवा आला

लहान असूनसुद्धा?

कुणालाही लहान समजू नका

कोण कधी कुणाला आडवा येईल सांगता येत नाही..”

(पुढे चालू)

Continue reading

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, "सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...
Skip to content