Friday, November 22, 2024
Homeमाय व्हॉईसअनिलबाबू के चक्कर...

अनिलबाबू के चक्कर में, किसकिसके फेरे?

अनिल देशमुख यांच्या ताफ्यात एकंदर ३५ माणसे कार्यरत होती. त्यापैकी अद्याप फक्त कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची तेवढी सीबीआयने चार तास एकत्र आणि वेगवेगळे, अशा  पद्धतीने चौकशी केली. अनिल देशमुख यांच्यानंतर आणखी कोणाची चौकशी, हा प्रश्न तसा अनुत्तरित असला तरी त्यांच्या कार्यालयातले राजेंद्र आहिवार, योगेश कोठेकर, चौधरी, काद्री, चिंतन थोरात, रवी व्हटकर असे आणखी काही महत्त्वाचे मोहरे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नाहीत.

विशेषतः राजेंद्र अहिवार तर जवळपास १०-१२ वर्षे अनिल देशमुखांचा उजवा हात म्हणून ओळखला जात असल्याने त्यांची कसून चौकशी झाल्यास सीबीआयचे काम अधिक, नक्की सोपे होणार आहे. शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही हे राजेंद्र अहिवार त्या देशमुखांच्या कार्यालयातील अत्यंत महत्त्वाच्या नस्त्या कशा स्वतः हाताळायचे आणि त्यावर आपल्या अक्षरात कसे बेकायदेशीर पद्धतीने शेरे लिहून मोकळे होत असे त्याची कबुली स्वतः संजीव पलांडे आणि सचिन वाझे यांनी आपणहून सीबीआयकडे दिल्याचे समजते. त्यामुळे आज ना उद्या राजेंद्र यांस सीबीआयने चौकशीसाठी बोलावल्यास त्यातून मोठे बिंग नक्की बाहेर पडणार आहे.

अत्यंत महत्वाचे म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने अहिवार सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यावेळेच्या गृहमंत्र्यांकडे कोणतीही अशी नियुक्ती केलेली नसताना कोणत्या अधिकाराने ते शासकीय महत्त्वाच्या फाईल्स हाताळत असे हे न उलगडलेले कोडे आहे. संजीव पलांडे आणि राजेंद्र अहिवार हे अनिल देशमुखांच्या काळातले अत्यंत, अत्यंत महत्त्वाचे असे मोहरे होते. तसेच रवी व्हटकर आणि योगेश कोठेकर व कुंदन शिंदे या मंडळींना जर सीबीआयने आपला खास खाक्या दाखवून बोलते केले तर सीबीआयचे काम खूप सोपे होणार आहे.

अनिल

अद्याप ठाणे जिल्ह्यातील बदल्यांच्या संदर्भात सीबीआयने लक्ष घातलेले दिसत नाही. त्याकडे त्यांनी लक्ष दिल्यास सर्वप्रथम राजेंद्र अहिवार गजाआड होण्याची अधिक शक्यता निर्माण होईल. बढत्या, बदल्या, हिअरिंग, परवाने, गुटख्याचा काळा बाजार हे विषय पलांडे व अहिवार यांच्याकडून समजावून घेणे अधिक उचित व योग्य ठरेल..

संजीव पलांडे, राजेंद्र अहिवार, रवी व्हटकर, कुंदन शिंदे या चार प्रमुख मोहऱ्यांची नावे पुढे आलेली असली तरी त्यातले आणखी एक अत्यंत महत्त्वाचे नाव विशेष उजेडात आलेले नाही. आणि हे महाशय आहेत अनिल देशमुख यांचे गेली अनेक वर्षे पीएशीप सांभाळणारे, अनिल देशमुख व देशमुख कुटुंबियांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार व गुंतवणूक बघणारे, सांभाळणारे तसेच स्वतःसाठी की देशमुखांची हप्तेवसुली करून कोट्यवधी रुपये जमा करणारे योगेश कोठेकर. नागपुरातल्या स्थानिक बातम्या देणाऱ्या महाराष्ट्र न्यूज ७ या वाहिनीने तर योगेश कोठेकर कशा पद्धतीने स्वतःसाठी व अनिल देशमुख यांच्यासाठी हप्तेवसुली करायचे त्यावर अनेक पुरावेच सादर केले आहेत. याचा मोठा उपयोग पुरावे जमा करताना सीबीआयला नक्की होणार आहे.

कोठेकर हे आजकालचे नव्हे तर तब्बल २०-२२ वर्षे देशमुख कुटुंबियांचे विश्वासू व स्वीय सहाय्यक म्हणून काम बघताहेत. त्यामुळे अमुक दिवशी अनिलबाबूंनी कोणत्या ब्रॅण्डची आणि कोणत्या रंगाची अंडरवेअर घातली होती याचीसुद्धा माहिती म्हणे योगेश कोठेकर यांना असते. त्यामुळे त्यांना तातडीने बोलते करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहे..

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
Skip to content