Skip to content
Tuesday, December 24, 2024
Homeटॉप स्टोरीआज राज्य मंत्रिमंडळाच्या...

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयच नाही!

दरम्यान, आज दुपारी सह्याद्री अतिथागृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकही निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

या बैठकीत राज्यातल्या कोविड परिस्थितीवर चर्चा झाली.  संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याविषयी नागरिकांत जनजागृती करणे, ‘मी जबाबदार’ मोहिमेची अंमलबजावणी तसेच सर्वांना लसीकरण याबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले, असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

पूजा चव्हाणप्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न

पूजा चव्हाण, या २२ वर्षीय तरूणीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याऐवजी राज्य सरकारकडून हे प्रकरण पोहरादेवी येथील गर्दीच्या विषयाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुण्यात पूजा चव्हाणचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या घटनेला साधारण १५ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी साधा एफआयआरही दाखल केलेला नाही. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. यातील १२ ऑडिओक्लिप बाहेर पडल्या आहेत. याशिवाय दोघांचे एकत्रित असे अनेक फोटो समाजमाध्यमातून वायरल झाले आहेत. पूजा चव्हाणबरोबर राहणाऱ्या दोघा तरूणांनाही पोलिसांनी जुजबी चौकशी करून सोडून दिले. या प्रकरणातील संशयित संजय राठोड तब्बल १५ दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर काल वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या श्रद्धास्थानी हजर झाले. यावेळी प्रचंड जनसमुदाय जमला होता.

दोनच दिवसांपर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न जमविण्याचे तसेच तोंडावर मास्क व सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला तिलांजली देत शिवसेनेचे हे मंत्री आपल्या हजारो समर्थकांसह पोहरादेवी येथे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे चांगलेच हसे झाले आणि त्यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

या घटनेनंतर मंगळवारीच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील बाहेर पडला नसला तरी त्यात संजय राठोड यांच्या पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जाते. त्यापाठोपाठ बुधवारी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राठोड यांच्या पोहरादेवी भेटीला झालेल्या गर्दीबद्दल नापसंती व्यक्त केली. पूजा चव्हाण मृत्यू तसेच पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीची लवकर चौकशी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पोहरादेवी येथील गर्दी कोणामुळे झाली, कोणी लोकांना बोलावले, या गर्दीमागचे कारण काय, अशा सर्व बाबींची चौकशी झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री कायद्याचा अवमान खपवून घेणार नाहीत, मग तो शिवसेनेचा असला तरी.. असे सांगत पोहरादेवीच्या गर्दीच्याच चौकशीकडे लक्ष केंद्रीत केले.

दरम्यान, आज संजय राठोड राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सहभागी झाले. संध्याकाळी त्यांनी वर्षा, या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व घडामोडी पाहता राज्य सरकार तसेच सरकारमधील घटकपक्षांकडून विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरील लक्ष पोहरादेवीच्या गर्दीकडे वळविण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...