Homeचिट चॅटप्रवेशपरीक्षांच्या तयारीसाठी भाजपाचा...

प्रवेशपरीक्षांच्या तयारीसाठी भाजपाचा अभिनव उपक्रम

अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईईसारख्या प्रवेशपरीक्षांसाठी योग्यप्रकारे सराव व्हावा या उद्देश्याने भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत “ऑनलाईन मॉक टेस्ट पेपर सिरीयल सेट” हा उपक्रम सुरु केला आहे. या संदर्भातील संकेतस्थळाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.

परीक्षा संपल्यानंतर या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास व सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी या चाचण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना www.divyadholay.com या पोर्टलवर नावनोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेनुसार प्रत्येक परीक्षेच्या ३० प्रश्नांची प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपक्रमाच्या संयोजिका दिव्या ढोले यांनी केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content