Homeचिट चॅटमुंबईच्या मेट्रो स्टेशनवर...

मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर झळकणार वेदांत शिंदेचं चित्र!

मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी मेट्रो – रंग दे मेट्रो’ या स्पर्धेच्या खुल्या गटात बाजी मारणाऱ्या वेदांत शिंदे याचे चित्र मुंबई मेट्रोच्या एका स्थानकावर रंगविले जाणार आहे.

या स्पर्धेत सर्वात लहान स्पर्धक असलेल्या १४ वर्षीय वेदांत शिंदे याच्या ‘स्पिरिट ऑफ मुंबईट’ या चित्राला विशेष पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत भारताच्या १२ राज्यांतल्या तसेच विदेशातून ३४००हून स्पर्धक सहभागी झाले होते.

यापूर्वी वेदांतने मुंबई महानगरपालिका तसेच बेंगळुरू येथील मेजर अक्षय गिरीश मेमोरियल ट्रस्टच्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील पारितोषिक प्राप्त केले आहे. या स्पर्धेतल्या उत्कृष्ट ३० चित्रांचे प्रदर्शन सध्या मुंबईच्या घाटकोपर मेट्रो स्थानकावर भरविण्यात आले असून त्यात या चित्राचा समावेश करण्यात आला आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content