HomeArchiveपोलखोल गडचिरोली-चिमूरची!

पोलखोल गडचिरोली-चिमूरची!

Details
पोलखोल गडचिरोली-चिमूरची!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने
[email protected]

दुर्गम भाग, माओवाद्यांच्या धमक्या.
लोकसभेच्या पहिल्या भागात माओवादी प्रभावित गडचिरोली-चिमूर मतदारसंघात निवडणूक होत आहे. भाजपने विद्यमान खासदार अशोकराव नेते यांना पुन्हा संधी दिली असून काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवले आहे. असे असले तरी माओवादी बहिष्कार आणि धमक्या या पार्श्वभूमीवर उमेदवार सर्वत्र पोहोचलेलेच नाहीत. प्रचाराचा जोर मर्यादित भागांपुरता आहे. परिणामी ही निवडणूक कोणतेही मुद्दे, प्रश्न याविना होत आहे. 2014 च्या मोदी लाटेत विद्यमान खासदार नेते निवडून आले. त्यांनी नामदेव उसेंडी यांचा पराभव केला तरीही काँग्रेसने यावेळी उसेंडी यांनाच उमेदवारी दिली आहे. 2009 च्या निवडणुकीत कोवासे यांनी नेते यांना हरवले होते. या मतदार संघाच्या भूभागाचा विचार करता देशात सर्वात विस्तृत असा हा माओवादी कारवायांनी प्रभावित मतदारसंघ आहे. येथे उमेदवारांना पोहोचताना अडचणी येतात. प्रचार संपायला दोन दिवस उरले असतानाही अनेक गावांमध्ये उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नाहीत. या भागातील मतदारांना, दुर्गम भागातील या आदिवासींना आपले मुद्दे, चिन्ह पटवून देण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. आमगावपासून सुरू झालेल्या या मतदारसंघाचे शेवटचे टोक गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आहे. सर्वाधिक मागास आदिवासीबहुल भाग दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती या मतदारसंघांमध्ये आहे. छत्तीसगडच्या सीमेला लागून हा भाग आहे. अतिदुर्गम, रस्ते नसलेल्या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे या गावांतही मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठीण जात आहे. उमेदवारांनी तालुका पातळीवरच्या स्थानिक नेत्यांवर मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी दिली आहे. भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांतील अनेक गावे अतिदुर्गम आहेत. माओवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत. या तालुक्यातील लहान गावांचे अंतर चार ते पाच किलोमीटर इतके आहे. नऊ ते दहा कुटुंब इतकीच लोकसंख्या या गावांमध्ये आहे.

उपलब्ध वेळेत या भागात पोहोचणे शक्य नसल्याने उमेदवारांनी चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या भागात दर दोन-तीन किमीवर दोनशे कुटुंबाचे गाव तरी किमान आढळते. या गावांमध्ये पोहोचून प्रचार केल्यास कमी कालावधीत अधिक लोकांपर्यंत पोहोचता येते. येथील अनेकांना आपला नेमका कोण उमेदवार रिंगणात आहे हेदेखील ठाऊक नाही. दुर्गम भाग, त्यात टीव्हीची सोय नसल्याने बाहेरच्या घडोमोडी फारशा कळत नाहीत. त्यातच मोबाइल नेटवर्क नसल्याने सोशल मीडियाचा प्रचार नाही. त्यामुळे ना गावगप्पा वा वादविवाद सगळेच कसे शांत आणि निरस.

थोडक्यात येथे निवडणूक आहे की नाही असे वाटावे अशीच परिस्थिती आहे. उद्या गुरुवारी (११ एप्रिल) येथे मतदान होत आहे. एकीकडे दुर्गम भाग, माओवाद्यांच्या धमक्या या पार्श्वभूमीवर किती टक्के मतदान होते हेच लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे.”
 
“अतुल माने

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content