HomeArchiveआतातरी तरी ताळ्यावर...

आतातरी तरी ताळ्यावर या!

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“भारतात लॉकडाऊनच्या १६ दिवसानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ५८६५ रूग्णांची नोंद झाली. यामध्ये महाराष्ट्रातल्या १३६४ रूग्णांचा समावेश असून आतातरी राज्य सरकारने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत.”
 
“आज देशात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कालपर्यंतची आकडेवारी पाहिली तर ती १३६४ होती. त्याचवेळी अंदमान-निकोबार- ११, गोवा- ७, हिमाचल प्रदेश- १८, पुद्दूचेरी- ५, झारखंड- ४, केरळ- ३४५, उत्तर प्रदेश- ३६१, आसाम- २८, दिल्ली- ६६९, जम्मू-काश्मीर- १५८, ओडिशा- ४२, कर्नाटक- १८१, तेलंगाणा- ४२७, गुजरात- १७९, राजस्थान- ३८१, उत्तराखंड- ३३, मिझोराम- १, तामीळनाडू- ७३८, बिहार- ३८, अरूणाचल प्रदेश- १, पंजाब- १०१, मध्य प्रदेश- २२९, प. बंगाल- १०३, आंध्र प्रदेश- ३४८, लडाख- १४, छत्तीसगड- १०, मणिपूर- १, हरयाणा- १४७ व चंदीगड येथे १८ रूग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी पाहता महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वांच्या तुलनेत कितीतरी मोठी आहे. यात मुंबईची संख्या तर जवळजवळ निम्मी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा दरही जगाच्या दरापैक्षा जास्त आहे. जगाचा मृत्यूदर साडेपाच टक्क्यांपर्यंत असताना महाराष्ट्रात तो सहा टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळेच आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मात्र नुसते जागे होऊन चालणार नाही तर त्यादृष्टीने अंमलबजावणीही करावी लागणार हे, असे सामान्य नागरिकांचे मत आहे.”
 
“राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल २२९ रूग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या आता १३६४ झाली आहे. यामध्ये मुंबईतल्या ७४६ रूग्णांचा समावेश आहे. मुंबईतल्या वाढत्या रूग्णांची संख्या चिंता वाढवणारी असून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यामुळेच धारावीसारख्या गर्दीच्या वसाहतींमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपी) वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी दिली.”

 
“पोलीस नियंत्रम कक्षाच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे सर्व प्रमुख रस्त्यांच्या निगराणी ठेवली जात आहे. मात्र, यामुळे आतल्या भागांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी टेहाळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीसारख्या दाट वस्तींच्या वसाहतीत एकेका सार्वजनिक शौचालयाचा वापर दिवसभरात दोनशेहून अधिक लोक करतात. त्यामुळे स्वच्छतेचा आणि निर्जंतुकीकरणाचा मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर उपाययोजना म्हणून अशा वसाहतींमधली सर्व शौचालये दर तास, दोन तासांनी जेटच्या माध्यमातून स्वच्छ करण्याची जबाबदारी अग्नीशामक दलाकडे सोपविण्यात आली आहे. ड्रोनच्या सहाय्यानेही ती स्वच्छ केली जातील, असे आरोग्यमंत्री म्हणाले.”
 
“हातावर पोट असलेल्या लोकांसाठी तसेच घराघरांमधून कुटिरोद्योग करून पोट भरणाऱ्या लोकांसाठी आज इस्कॉन, श्री श्री रविशंकर आदींच्या संस्थांमार्फत मोफत जेवण पुरवले जात आहे. परंतु, ही व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कम्युनिटी किचनतर्फे या लोकांना जवण पुरविण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही टोपे म्हणाले.”
  

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content