HomeArchiveमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत युवा महासंगम!

Details
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत युवा महासंगम!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

५० हजार तरूण येणार

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईमध्ये आयोजित होत असलेल्या ‘सीएम चषक’च्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा महासंगम’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे ५० हजारांहून अधिक तरूण-तरूणी भाग घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. सायनच्या सोमैया ग्राउंडमध्ये आयोजित होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ४३ लाख स्पर्धकांपैकी निवडले गेलेले ५० हजार तरूण-तरूणी या सोहळ्यात सहभागी होतील. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ही माहिती दिली.
सीएम चषकाच्या या भव्य समारोहात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम १२९ विजेत्यांना सन्मानित करतील. सीएम चषकचा अंतिम सोहळा यशस्वी करण्यासाठी सोमैय्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सीएम चषकची सांगता भव्य कार्यक्रमाच्या रूपाने व्हावी यासाठी कार्यकर्ते पूर्ण उत्साहाने एकत्र काम करताना दिसून येत आहेत.

सीएम चषकच्या एकूण १२ स्पर्धांमध्ये राज्यभरातील सुमारे ४३ लाख स्पर्धकांनी भाग घेतला. यातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून ५० तरूण-तरूणी युवा महासंगममध्ये सहभागी होतील. महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात युवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक आदर्श शिंदे ‘सीएम चषक’साठी रचलेलं प्रसिद्ध गीत ‘घेऊन टाक’ गातील. कार्यक्रमाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील सर्वात मोठी रांगोळी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून त्याचवेळी फॉर्म भरून या योजनांचा लाभ घेण्याची संधी गरजूंना मिळणार आहे. सोबतच तरूणाची आवड लक्षात घेऊन सेल्फी पॉईंटचे आकर्षणदेखील य कार्यक्रमात असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटाऊटसोबत फोटो घेण्याची संधी मिळणार आहे. तरूणांची विचारधारा लक्षात घेऊन या सोहळ्यात भाजपाच्या जाहिरनाम्यामध्ये तरूणाचे विचार समाविष्ट करून घेण्यासाठी सूचनापेटीदेखील ठेवण्यात येणार आहे.”
 
“५० हजार तरूण येणार

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content