HomeArchive'एसएएसए'च्या मैदानी खेळांच्या...

‘एसएएसए’च्या मैदानी खेळांच्या स्पर्धेत आरव सिधवानी आणि तनिष्का कृष्णनची बाजी!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
स्कूल्स अससोसिएशन फॉर स्पोर्ट्स अँड ऍथलेटिक्स (एसएएसए) संघटनेतर्फे आयोजित केलेल्या मैदानी खेळांच्या शालेय स्पर्धेत जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ११८ गुणांची लयलूट करीत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. वैयक्तिक प्रवर्गात अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेच्या आरव सिधवानी आणि जेबीसीएन स्कूलच्या तनिष्का कृष्णनने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला.

ही स्पर्धा घाटकोपरच्या सोमय्या मैदानावर नुकतीच झाली, अशी माहिती संघटनेचे आशिष गोयल यांनी दिली. या स्पर्धेत १६ वर्षाखालील वयोगटात आरव सिधवानीने १००, २००, ८०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण तर गोळाफेकमध्ये कांस्यपदक मिळविले. त्याने एकूण २१ गुण मिळवत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. बाँम्बे केम्ब्रिज इंटरनॅशनलच्या पृथ्वी भटने १२ वर्षांखालील गटामध्ये संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करून लक्ष वेधले. याच वयोगटातील तनिष्का कृष्णनने १०० मीटर धावणे, लांब उडी गोळाफेकमध्ये सुवर्ण तर २०० मीटर धावणेमध्ये रौप्यपदक पटकावले. तिने एकूण १८ गुण पटकावून मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. १६ वर्षांखालील वयोगटात वित्तदा बडगेरी हिने १००, २०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत व्दितीय स्थान मिळविले.

विविध गटामधील विजेते पुढीलप्रमाणे

मुले: १६ वर्षांखालील गटामध्ये – आरव सिधवानी (अमेरिकन स्कूल), १४ वर्षांखालील गटात – आर्यन मिश्रा (आरबीके इंटरनॅशनल), १२ वर्षांखालील गटात – पृथ्वी भट (बाँम्बे केम्ब्रिज), १० वर्षांखालील वयोगटात – जेहान मलू (आरबीके), ८ वर्षांखालील वयोगटात – क्रिशय शाह (जेबीसीएन) व समर्थ राय (आरबीके).
मुली: १६ वर्षांखालील गटामध्ये – वित्तदा बडगेरी (जेबीसीएन), १४ वर्षांखालील गटात – आईरा अगरवाल (जेबीसीएन), १२ वर्षांखालील गटात – तनिष्का कृष्णन (जेबीसीएन), १० वर्षांखालील वयोगटात – आयांना अगरवाल (जेबीसीएन), ८ वर्षांखालील वयोगटात – खैन जैन (डॉन बॉस्को इंटरनॅशनल).”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content