HomeArchiveलोकप्रतिनिधींनी लोकसंख्यावाढीवर बोलावे...

लोकप्रतिनिधींनी लोकसंख्यावाढीवर बोलावे – खा. सुप्रिया सुळे

Details
लोकप्रतिनिधींनी लोकसंख्यावाढीवर बोलावे – खा. सुप्रिया सुळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

केएचएल न्यूज ब्युरो
देशातील सर्व समास्यांच्या मुळाशी लोकसंख्या वाढ हे महत्त्वाचे कारण आहे. भविष्यात लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा व समाजामध्ये लोकजागृती केल्यास समस्यांचे निराकरण करता येतील. मी पुन्हा निवडून आले, तर लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवेन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत अस्मिता फौंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्यातील ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी केरळच्या कोझीकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. देबाशिश चटर्जी यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’, अभिनेते स्वानंद किरकिरे यांना, ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव यांना, ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कारा’, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ आणि सॉफ्टवेयर इंडस्ट्रीजचे जनक डॉ. एफ. सी कोहली यांना ‘भारत अस्मिता विशेष जीवन गौरव पुरस्कार’ यांनी गौरविण्यात आले. जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व प्रत्येकी सव्वा लक्ष रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी तुळशीराम दा. कराड, बिहारचे पर्यटन मंत्री प्रमोद कुमार, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटीडब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, प्रो होस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वारसा रक्ताने मिळत नसतो. तो मेहनतीने आणि स्वकष्टाने मिळवता आला पाहिजे. देशात शहरी व ग्रामीण बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. बेरोजगारी वाढण्यासाठी लोकसंख्या वाढ हे महत्त्वाचे कारण आहे. भविष्यात सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी लोकसंख्यावाढीचा मुद्दा घेऊन लोकजागरण केले पाहिजे. सत्तेत नसताना केवळ टीका करता येते. मात्र सत्तेत असताना जबाबदारी स्वीकारून कार्य करावे. प्रत्येकांच्या आयुष्यात यश आणि अपयश येत असते. अपयश आल्याने खचून न जाता त्याचा सामना करत हिंमतीने पुढे आले, तर यश निश्‍चित मिळते. हा मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावा. शिक्षण हे मानवी जीवनाला आकार देऊ शकते, त्यामुळे क्षमतापूर्ण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली असावीत.

डॉ. एफ. सी. कोहली म्हणाले की, देशात आजही १० टक्के निरक्षर नागरीक आहेत. ही देशासाठी भूषणावह बाब नाही. कृषी हा सायन्सचा विषय असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होत नाही. पाण्याचे स्त्रोत आटले असून जमिनीचा पोत खराब झाला आहे. यातच शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे बियाणे मिळत नसल्यामुळे उत्पादन घटत आहे. परिणामी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशात २० टक्केच नागरिकांना इंग्रजीची ओळख आहे. त्यामुळे संगणकाची भाषा ८० टक्के नागरिकांना कळत नाही. भविष्यात भारतीय भाषेतील हार्डवेअर आणि सॉप्टवेअर तयार केले जावेत.

डॉ. देबाशिश चटर्जी म्हणाले की, जागतिक स्तरावर भारतीय विचार पोहोचविण्याचे कार्य स्वामी विवेकानंदानी केले. या देशातील संत-महंतांनी मानवता कल्याणाचे आणि शांतीचे विचार दिले. सत्यम, नित्यम आणि पूर्णम हे जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. या सूत्रांचा वापर आपल्या आयुष्यात करावा.

डॉ. चंद्रकांत पांडव म्हणाले की, माझ्या वडिलांनी मला समस्यांच्या निराकरणाचे प्रशिक्षण दिले. भविष्याला आकार देताना गुरू, संधी आणि मार्गदर्शन महत्त्वाचे आहेत. निरोगी समाज घडविण्यासाठी सर्वांनी आपापले कार्य मेहनतीने करावे. सर्वांच्या जीवनात आरोग्य महत्त्वाचे आहे.

डॉ. शेखर मांडे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकशाही मजबूत करण्याचे काम झाले. निवडणुकांमध्ये पारदर्शकता तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे झाली. विज्ञानासोबत कृषीच्या क्षेत्रात संशोधन केले जात आहे. भविष्यात कृषीलाही महत्त्वाचे दिवस येतील.

स्वानंद किरकिरे म्हणाले की, सध्याच्या काळात शिक्षण संस्थांमध्ये राजकारणावर बोलले जात नाही. मात्र एमआयटी शिक्षण संस्थेत राजकारणाचे धडे दिले जात आहे. भविष्यात हे भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचे असणार आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, शिक्षणात भविष्याला आकार देण्याची क्षमता असल्यामुळे भारत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. देशात परिवर्तन आणायचे असल्याने संशोधनाला आणि संशोधनात्मक विचाराला महत्त्व द्यावे लागेल.

डॉ. विजय भटकर म्हणाले की, भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे त्यात रममाण झाले. त्यामुळे भारत हा ज्ञानाचा प्रकाश देणार देश म्हणून पुढे येईल. यामुळेच चीनपेक्षा भारत हा सर्वच्च स्तरावर येईल.

प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले की, नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून होत आहे. विज्ञान आणि अध्यत्माच्या समन्वयातून निर्माण होणार्‍या पिढीच्या माध्यमातून भारत देश विश्‍वगुरू बनण्यास वेळ लागणार नाही. २१व्या शतकात भारत हा जगाच्या ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि या जगाला शांतीचा मार्ग दाखवील. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांच्याद्वारे भारतीय तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे.

एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले.”
 
“एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content