HomeArchiveसोशल मीडियाचे 'सुजाण'...

सोशल मीडियाचे ‘सुजाण’ वापरकर्ते होऊया!

Details
सोशल मीडियाचे ‘सुजाण’ वापरकर्ते होऊया!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

स्नेहा कोलते, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
एकविसावे शतक हे एका अर्थी क्रांतिकारक शतक ठरणार आहे. समाजमाध्यमात झालेली क्रांती आणि या समाजमाध्यमांचा झालेला प्रभावी वापर पाहता येत्या काळात समाजमाध्यम आपल्या आयुष्यातील मूलभूत घटक बनेल. मात्र या माध्यमाचा प्रभावी वापर करण्याच्या नादात आपण त्यांचा अतिरेक करतोय हे ध्यानात राहिले म्हणजे झाले. सोशल मीडियाचा सर्वात जास्त आणि चांगला फायदा झाला तो भाजप सरकारला. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियावर केलेल्या प्रचाराचा फायदा आपण पहिलाच. आता लोकसभेच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं आईटी सेल पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिवाय इतर पक्षांनीही या सोशल मीडियाचा जास्तीतजास्त फायदा करून घेण्यासाठी सुरुवात केली आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निवडणुकीत प्रवेश केल्यावर त्यांच्यावर सरकारपक्षाने कडाडून टीका केली. एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली. मात्र ही चिखलफेक जेव्हा अश्लिलतेवर आली तेव्हा समाजमाध्यमात यावर बरीच चर्चा झाली. राहुल गांधी यांचा चेहरा आणि प्रियांका गांधी यांचे धड वापरून एक फोटो फोटोशॉप करण्यात आला. अनेक भाजप समर्थक ग्रुपवर हा फोटो व्हायरलही झाला. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना भाजपकडून झालेला हा घाणेरडा प्रचार नक्कीच क्रोधकारक आहे. सरकारी यंत्रणेकडूनच जर अशा नीचपणाला खतपाणी मिळाले तर सतत सक्रिय असणाऱ्या तरुणाईला काय बोध मिळेल? सोशल मीडियाचा गैरवापर हा फक्त राजकीय पक्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणांची माथी भडकवणे, अफवा पसरवणे याहूनही पलीकडे हा प्रकार गेला आहे.

काही महिन्यांपूर्वी झुंडीने जाऊन हाणामारी झाली होती. सोशल मिडियावर पसरलेल्या काही अफवेमुळे हा सामाजिक हिंसाचार घडला होता. फोरवर्डेड संस्कृती इतकी रुजली आहे की कसलाही विचार न करता संदेश इकडून तिकडे सहज फेकले जातात. संदेशामागची सत्यता तपासली जात नाही, त्यामुळे अफवांना उधाण येतं. सामाजिक हिसाचारानंतर वव्हाट्सएपने नियम कडक केले. मात्र समाजकंटकांनी कसलीही तमा न बाळगता प्रत्येक गोष्टीचा अपप्रचार करणं सुरू ठेवलं आहे. स्वयंघोषित वैद्यांनीही आरोग्यविषयक टिप्स द्यायला सुरूवात केली आहे. या टिप्स आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या आहेत हे सगळ्यांना माहित असतानाही असे संदेश बिनदिक्कत पाठवले जातात. म्हणून सोशल मीडियाचा वापर व्यासपीठ म्हणून करताना आपण नक्की काय वाचतोय, फॉरवर्ड करतोय याची जाणीव असली पाहिजे. सुजाण वापरकर्ते म्हणून आपलं सगळ्यांचं ते कर्तव्यच आहे.”
 
“स्नेहा कोलते, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content