Homeचिट चॅटशहरांतल्या निम्म्या तरूण-तरूणींची...

शहरांतल्या निम्म्या तरूण-तरूणींची डेटिंग एप्सना पसंती!

भारतात शहरी भागांतल्या २४ ते ४० (मिलेनियल) आणि १८ ते २४ (जनरेशन झेड) वर्षे वयोगटातल्या सुमारे ५० टक्के तरूण-तरूणींनी डेटिंग एप्सवर आपला जोडीदार निवडण्यास पसंती दिली असून त्यासाठी त्यांच्या मातांनीही संमती दिली असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

भारतात डेटिंग या संकल्पनेबद्दल सध्याच्या काळात असलेले समज-गैरसमज शोधून काढण्यासाठी ट्रूली मॅडलीतर्फे पाच हजार तरूण-तरूणींमधून हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून आणखी एक बाब पुढे आली. ती म्हणजे ८० टक्के मुंबईतील मातांनी आपल्या  मुलांनी प्रेमविवाह करायला पाठिंबा दर्शविला आहे.

काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे:

  • प्रतिसादकांपैकी ४५ टक्क्यांहून अधिक जणांनी असे मत व्यक्त केले की, त्यांच्या  लग्नाबद्दल त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांच्या आईला जास्त काळजी वाटते. स्त्री-पुरुष दोन्ही प्रतिसादकांसाठी हे लागू आहे.
  • मोठमोठी शहरे आणि महानगरांमधल्या जवळपास ७० टक्के स्त्री आणि ८० टक्के पुरुष प्रतिसादकांनी त्यांच्या मातांची प्रेमविवाहाला पसंती असल्याचे सूतोवाच केले. मध्यमवयीन स्त्रिया जेव्हा शिक्षण आणि करियर यांच्यावर भर देताना लग्नाचा विषयमागे ठेवतात. एक वेळ येते की, आता  ‘स्थिरस्थावर’ व्हायचे असते. तेव्हा पर्यायातील मोठी स्वीकाराहर्ता यातून सूचित होते.
  • मिलेनियल्स आणि जनरेशन झेडच्या मातांना आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंगअॅप्सचा वापर करण्याबद्दलही  आत्मविश्वास असल्याचे ५० टक्के प्रतिसादकांनी  सांगितले. २० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसादकांनी त्यांच्या आयांना डेटिंग अॅप्सबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले आणि केवळ ७ टक्के प्रतिसादकांनी आपल्या  मातांची डेटिंग अॅप्सला पसंती नसल्याचे सांगितले.
  • जयपूर, इंदौर, लखनौसारख्या नॉन मेट्रो शहरांतील माता आपल्या मुलीच्या पसंतीला प्राधान्य देतात तर ५५ टक्के प्रतिसादकांनी असे सांगितले की, पुरुषांवर लग्नासाठी  जास्त दबाब टाकला जातो. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकातासारख्या  महानगरांमध्ये अधिक स्त्रिया काम करत असल्यामुळे ५३ टक्के प्रतिसादकांनी आया मुलींवर जास्त दबाव टाकत असल्याचे सांगितले.
  • आपल्या मुलींनी करियर आणि अभ्यास यांच्यापेक्षा लग्नाला प्राधान्य द्यावे असे  मातांना वाटत असल्याचे ६० टक्के प्रतिसादकांनी सांगितले तर मुलांच्या बाबतीत हेच प्रमाण ४६ टक्के आहे. ५४ टक्के प्रतिसादकांना असे वाटते की, आयांना त्यांच्या  मुलांच्या करियर आणि शिक्षणाची जास्त काळजी वाटते.
  • सुरक्षा, वय आणि समाज या तीन गोष्टीभोवतीच आया विवाहाची चर्चा करत असतात-‘आम्ही काय आज आहोत, उद्या नसू’,  ‘आता आम्ही तुमची काळजी घेत आहोत.  आमच्यानंतर तुमची काळजी कोण घेणार?’, ‘नंतर कोणी मिळणार नाही’ आणि ‘लोकं काय म्हणतील’, असे मुख्य प्रश्न असतात.
  • सध्याच्या काळानुसार मातांनी नवीन बदल स्वीकारलेले असले तरी २२ टक्के  प्रतिसादकांनी डेटिंग अॅप्सबद्दल चर्चा करायला विरोध दर्शविला. याला अनुमोदन  मिळेल का, याविषयी तरुणाईच्या मनात असणारी भीती यातून सूचित होते.
डेटिंग

ट्रूली मॅडलीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहिल खानोर म्हणाले की, डेटिंग संकल्पनेबद्दल भारतात पूर्वग्रह, गैरसमजुती, भीती आहे का हे समजून घेण्यासाठी  आम्ही बाहेर पडलो. पण केवळ तरुणाईच नाही तर त्यांच्या पालकांनीही बदलाचे वारे  स्वीकारले असल्याचे पाहून, मानसिकतेत झालेला बदल पाहून थक्क झालो. महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष भेद कमी करणे आणि लिंगभेदावर आधारित गोष्टींविरुद्ध आवाज उठविणे याबाबत आपल्या समाजात अखंड सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा परिपाक आहे, असे माझे ठाम मत  आहे.

जोडीला चित्रपट आणि सोशल मीडिया यांमधून स्वतंत्र, मुक्त विचारसरणीचा वापर जास्त होतआहे. त्यातूनही आपल्या  मुलांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी त्यांच्यावर  विश्वास ठेऊन अनुरूपतेला प्राधान्य दिले जात आहे. या निष्कर्षातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की, माता ज्या कायम जुन्या सामाजिक रूढी, बंधनात अडकलेल्या असतात असे मानले जाते त्यांनी खूप झटपट हे नवे वारे स्वीकारले आहेत.

विवाहविषयक निर्णय प्रक्रियेत आयांची भूमिका लक्षात घेता जी तरुण पिढी विवाह  संस्थेविषयी वंचित भूमिका घेताना दिसायची ते आता पुढच्या वर्षांत या गोष्टीकडे सक्रीयपणे बघायला लागतील. सातत्यपूर्ण तांत्रिक नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून चांगले, दृढ मानवी  नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सामावून घेणारे डेटिंग व्यासपीठ उभारण्याच्या प्रवासाचा हा एक भाग असल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो, असेही त्यांनी सांगितले.

आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी मदत करणारे भारतातील सर्वाधिक पसंतीचे डेटिंग अॅप  असल्यामुळे ट्रूली मॅडली मिलेनियल्स आणि तरुण पिढीला निर्णय प्रक्रिया, विवाह,  नातेसंबधांबद्दलचे प्रश्न अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत सक्षम करत आहे. ट्रूली  मॅडलीने मिलेनियल्ससाठी त्यांच्याकडून आणि त्यांच्यासाठीच काहीतरी ठोस, प्रामाणिक शोध घेताना सर्वसाधारण डेटिंग अॅप आणि मॅट्रिमोनी वेबसाईट यांच्यामधील दरी भरून काढली  आहे. त्यामुळे प्रगत समाजात ‘स्थळ बघायचे का’ ही संकल्पना हळूहळू कालबाह्य होणार आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content