Homeब्लॅक अँड व्हाईटनागा रेजिमेंटच्या तिसर्‍या...

नागा रेजिमेंटच्या तिसर्‍या बटालियनला ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार!

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 13 ऑक्टोबरला उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे कुमाऊं रेजिमेंटल केंद्रात आयोजित पथसंचलनादरम्यान नागा रेजिमेंटच्या तिसर्‍या बटालियनला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार प्रदान केला.

कवायतींचे निरीक्षण केल्यानंतर लष्करप्रमुखांनी नागा रेजिमेंटच्या, परिचलन, प्रशिक्षण आणि क्रीडा प्रकारांसह लष्करी उपक्रमांच्या सर्व क्षेत्रातील समृद्ध परंपरेची प्रशंसा केली. अत्यंत कमी कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या रेजिमेंटच्या नवीन दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, लष्कर प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले, आणि मोठ्या अभिमानाने देशसेवा करण्यासाठी सर्व श्रेणींच्या अधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. 

लेफ्टनंट जनरल आर पी कलिता, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, पूर्व कमांड, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, कुमाऊ आणि नागा रेजिमेंट आणि कुमाऊ स्काउट्सचे कर्नल, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सेंट्रल कमांड, यांच्यासह सेवेमधील आणि सेवानिवृत्त कर्मचारी रंगीत सादरीकरण परेडला उपस्थित होते.  

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content