Wednesday, March 12, 2025
Homeकल्चर +'इंद्रायणी'चे ३०० भाग...

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!


कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बऱ्याच घटना बघायला मिळाल्या आहेत. इंदूचा संघर्षमय प्रवास.. त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं. या मालिकेने ३०० भागांचा पल्ला गाठला आहे.

दुसरीकडे, आपल्याला विठूच्या वाडीत इंदू आणि फँटया गॅंग बरीच धम्माल मस्ती करतानादेखील दिसतात. मालिकेमध्ये इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला आणि इंदू आनंदीच्या विळख्यात अजूनच अडकत गेली. इंदूचा आजवर दु:स्वास करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले. इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांनादेखील महाराजांना कळले. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत हे खूपच चुकीचं आहे हेदेखील समजविण्याचा प्रयत्न व्यंकू महाराज करताना दिसून आले. आता आंनदीबाईंचा खरा चेहरा व्यंकू महाराज इंदूच्या समोर आणू शकतील? इंदूचा यावर विश्वास बसेल? हे बघणे रंजक असणार आहे.

व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला की, इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत याचा खूप आनंद आहे. याआधी जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये मी चोळप्पाचे पात्र साकारले होते आणि आता मला व्यंकू महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये काम करत असताना मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. चोळप्पाची व्यक्तिरेखा साकारणे आणि आता व्यंकू महाराजांची भूमिका करणे या दोन्हींमध्ये खूप फरक होता. कारण चोळप्पाच्या व्यक्तिरेखेला एक ऐतिहासिक बाज, संदर्भ होता. पण, व्यंकू महाराजांच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. महत्त्वाचे म्हणजे वारकरी कीर्तन वा अभंग किंवा एकंदरीतच वारकरी सांप्रदाय याच्याशी खूप जवळून संबंध ही भूमिका साकारताना आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानग्या इंदूसोबत काम करताना आणि एका वेगळ्याच भाषेच्या लहेजामध्ये काम करताना खरंच खूप मजा आली. मालिकेचे ३०० भाग कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही. मालिकेतल्या सगळ्या लहान मुलांसोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंदाचा आणि खूप काही शिकवून जाणारा भाग होता. संपूर्ण टीमने केलेल्या उत्तम सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडतेय.. त्याची पावती मिळतेय हीदेखील माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content