Homeमुंबई स्पेशलजे. जे. उड्डाणपुलाखाली...

जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या राहणार बेस्टच्या ३ कालबाह्य डबलडेकर!

मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍ता दुभाजकाचे संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्‍वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावी, एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत, असे निर्देश मुंबईचे महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज दिले.

मुंबई महापालिकेच्‍यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्‍प’ हाती घेण्‍यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्‍या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे.उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्‍यात येत आहे.  या कामाची प्रत्‍यक्ष पाहणी गगराणी यांनी केली. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. सहायक आयुक्‍त (बी विभाग) शंकर भोसले यांच्‍यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

जे. जे. रूग्‍णालय जंक्‍शन ते महात्‍मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) हा वर्दळीचा मार्ग आहे. नागरिक, प्रवाशांच्‍या सोयीसाठी पालिकेने रस्‍ता दुभाजक बांधला आहे. संपूर्ण रस्‍ता दुभाजकाचे आकर्षक तसेच संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभिकरण करण्‍यात यावे. अंदाजे ३ मीटर रूंदीच्‍या दुभाजकाचे आकर्षक पद्धतीने बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावीत. ध्‍वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत. एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत. पर्यावरणपूरक सुशोभिकरण करावे. दुभाजकांचा दुरूपयोग होऊ नये, कठड्यांची मोडतोड, नासधूस होऊ नये यासाठी आवश्‍यक असल्‍यास सुरक्षाव्‍यवस्‍था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

या कामांतर्गत उड्डाणपुलाखालील ३ ठिकाणी ‘बेस्‍ट’च्‍या कालबाह्य डबलडेकर बसगाड्यांमध्‍ये कलादालन (आर्ट गॅलरी), उपाहारगृह (कॅफेटेरिया), वाचनालय (लायब्ररी) अशा खास सुविधा मुंबईकरांना उपलब्‍ध करून देण्‍याची योजना राबविली आहे. मंजूर केलेल्‍या संकल्‍पनेनुसारच ते विकसित करावे. त्‍याचे संचलन स्‍वयंसेवी संस्‍था / महिला बचत गटामार्फत करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले.

Continue reading

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात...

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...
Skip to content