HomeArchive26 फेब्रुवारीला सावरकर...

26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

Details
26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्‍या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content