Homeब्लॅक अँड व्हाईटगेल्या वर्षी 'भारत...

गेल्या वर्षी ‘भारत गौरव’ ट्रेनच्या झाल्या 172 फेऱ्या!

भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव’ पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे हा या संकल्पना आधारित पर्यटक मार्ग गाड्यांचा उद्देश आहे. गेल्या वर्षी, 2023मध्ये, 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या देशभरातील विविध पर्यटनस्थळांवरून 96,491 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या भारत गौरव गाड्यांच्या एकूण 172 फेऱ्या चालवण्यात आल्या. या गाड्यांनी श्री राम-जानकी यात्रा, अयोध्या ते जनकपूर, श्री जगन्नाथ यात्रा, “गरवी गुजरात” सहल, आंबेडकर सहल, ईशान्य सहल यासारख्या प्रमुख पर्यटनक्षेत्रांचा प्रवास केला आहे.

या गाड्यांमधील प्रवास खर्च सर्वसमावेशक सहल पॅकेजेसच्या स्वरूपात दिला जातो. यात आरामदायी रेल्वे प्रवास आणि संबंधित सेवांसह ऑफ-बोर्ड प्रवास आणि बसमधून स्थलदर्शन, हॉटेलमध्ये राहणे, सहल मार्गदर्शक, जेवण, प्रवास विमा इत्यादी सेवा पुरवल्या जातात.

भारत गौरव रेल्वेगाडी योजनेंतर्गत उत्तम दर्जाच्या डब्यांसह रेल्वे आधारित पर्यटनाच्या तरतुदीद्वारे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केन्द्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगानेही हे पाऊल उचलले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.irctctourism.com/bharatgaurav.

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content