Homeमुंबई स्पेशलछठपूजेसाठी मुंबईत १४८...

छठपूजेसाठी मुंबईत १४८ कृत्रिम विसर्जन तलाव तर ४०३ चेंजिंग रूम

मुंबईत आज आणि उद्या म्हणजेच २७ व २८ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या छठपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनामार्फत समुद्र किनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी छठपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांपैकी सर्वाधिक तलाव व टाक्या ह्या घाटकोपर परिसरात (एन विभाग) ४४, दहिसर (आर उत्तर विभाग) २२ तर कांदिवली परिसरात (आर दक्षिण विभाग) १६ इतक्या आहेत. यासह उर्वरित ठिकाणीदेखील कृत्रिम तलाव व टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी पाण्याची उपलब्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई महापालिकेने ३९ ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी उत्सव साजरा करण्यासाठीची ठिकाणे आणि कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे.

निर्माल्यकलश व स्वच्छतेची विशेष व्यवस्था

छठपूजेच्या काळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने व साधनसामग्री उपलब्ध असेल. पूजास्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूम्रफवारणी यावर भर दिला जाणार आहे. सर्व पूजास्थळांवर पुरेशा प्रमाणात निर्माल्यकलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी पूजेसाठी आवश्यकतेनुसार टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्सवकाळात ४०३ वस्त्रांतरगृह (चेंजिंग रुम)

या उत्सवासाठी ४०३ वस्त्रांतरगृह उभारण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात आला आहे. वाहनतळासाठीदेखील पोलिसांशी समन्वय साधण्यात येत आहे.

प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था

उत्सवस्थळी पिण्याच्या पाण्याची तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. छठपूजेच्या काळात सर्व उपाययोजना योग्यरितीने राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित अधिकारी नियमितपणे भेट देतील.

प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी

छठपूजा आयोजित करणाऱ्या संस्था/मंडळांना आवश्यक परवानग्या व समन्वयासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलीस व वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी व छठपूजा उत्सव शांततेत व सुसंवादाने साजरा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी खोल समुद्रात जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीत पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त (परिमंडळ-२) तथा समन्वय अधिकारी प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...

जिल्हा युवा महोत्सवातल्या सहभागासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत करा नोदणी

युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या हेतूने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव या वर्षी  ७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी आपली नोंदणी येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत  https://forms.gle/Kmof5utKSuEqL3P69 या...

‘महादेवा’त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा!

'महादेवा'त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा! हो.. १३ वर्षांखालील मुला-मुलींकरीता ही संधी आहे. महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (वायफा) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यशासनाच्या क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात महादेवा प्रकल्पांतर्गत एक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात...
Skip to content