Details
८ जागांवर अडलेय घोडे…काय होणार पुढे?
01-Jul-2019
”
जगदीश भोवड
[email protected]
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपाची चर्चा सुरू आहे. यापैकी दोन्ही पक्षांचे नेते ४० जागांवर एकमत झाले असल्याचे सांगत आहेत. मात्र अद्यापही ८ मतदारसंघांच्या बाबतीत घोडे अडले आहे. हे ८ मतदारसंघ म्हणजे पुणे, अहमदनगर, रावेर, जालना, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नंदूरबार आणि यवतमाळ-वाशिम हे होत. या आठही मतदारसंघांमध्ये सध्या शिवसेना-भाजपाचेच खासदार आहेत. या खासदारांना टक्कर देतील असे तगडे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे खरेच आहेत का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या आठही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपाला पराभूत करीत विजयी ठरण्याचा विश्वास दोन्ही काँग्रेसला खरेच वाटत आहे का?
या आठ मतदारसंघांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत असल्यामुळे पुढची चर्चा अडली आहे. त्यातल्या त्यात पुणे आणि अहमदनगरवरून तर मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रवादीपेक्षा एक-दोन जागा तरी जास्त पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर राष्ट्रवादीचा समसमान म्हणजे २४-२४ असे जागावाटप करावे, असा आग्रह आहे. काही मतदारसंघांची अदलाबदल करायची आहे. त्यावरूनही वाद सुरू झाला आहे. काही मतदारसंघ दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांसाठी व नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांसाठी मागितले जात आहेत. त्यातून पुणे व नगरसारख्या जागेवरून निवडणुकीच्या आधीच दोन्ही काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे.
पुणे लोकसभा मतदासंघात २०१४ मध्ये काँग्रेसकडे उमेदवारच नव्हता. राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपामुळे काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपाकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिरोळे यांनी विश्वजीत कदम यांना दोन लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. मनसेच्या दीपक पायगुडे यांनीही ६५,१७९ मते मिळवली होती. काँग्रेसने मोठ्या फरकाने गमावलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. कारण पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असा त्यांचा दावा आहे.
अहमदनगरमध्ये भाजपाचे खासदार म्हणून दिलीपकुमार गांधी हे निवडून आलेले आहेत. २०१४ मध्ये तेथे राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांनी लढत दिली होती. मात्र आता तेथील परिस्थिती बदललेली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दिलीपकुमार गांधींचा मुलगा आणि सून यांना मतदारांनी पराभूत करून त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी काँग्रेसला हवा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. दिलीप गांधी यांच्यावरील लोकांचा रोष पाहता येथे राष्ट्रवादीलाही जिंकण्याची आशा वाटत आहे, तर कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवणारच अशी भूमिका डॉ. सुजय विखे-पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे नगर आणि पुणे हे दोन मतदारसंघ एकमेकांच्या बदल्यात बदलले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या सहजपणे विजयी झाल्या होत्या. त्यांनी साडेपाच लाखांहून अधिक मते घेतली होती, तर राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांना २ लाख ६१ हजार ३३२ मते मिळाली होती. हा मतदारसंघही दोन्ही पक्षांना हवा आहे. त्यामागचे कारण म्हणजे २०१४ ची स्थिती आता नाही. खडसे यांचे भाजपामध्ये म्हणावे तसे वजन नाही, मात्र भाजपाकडून रक्षा खडसे यांनाच उमेदवारी मिळेल, यातही वाद नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी येथे कोण लढते आणि उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता लोकांमध्ये आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांचा जालना लोकसभा मतदारसंघही दोन्ही काँग्रेससाठी महत्त्वाचा वाटत आहे. या मतदारसंघात रावसाहेब दानवेंनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. आता येथे रावसाहेब दानवेंना पराभूत करता येईल, एवढा विश्वास दोन्ही काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पराभव झाला तर तो भाजपासाठी मोठाच धक्का ठरणार आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हाही दोन्ही काँग्रेससाठी कळीचा मुद्दा ठरलेला आहे. वास्तविक येथे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी अलीकडे सातत्याने विजय मिळवलेला आहे. आताही शिवसेनेकडून तेच रिंगणात असण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने नितीन पाटील यांना मैदानात उतरवले होते, मात्र ते प्रभाव पाडू शकले नाहीत. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस टक्कर देण्याचा विचार करीत आहे.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. या मतदारसंघात शिवसेना पुन्हा एकदा विनायक राऊत यांनाच मैदानात उतरवणार आहे. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. नीलेश राणे यांचा विनायक राऊत यांनी पराभव केला होता. राऊत यांना ४,९३,०८८ मते मिळाली होती, तर तत्कालीन खासदार डॉ. नीलेश राणे (काँग्रेस) यांना ३,४३,०३७ मते मिळाली होती. आता मात्र येथील परिस्थिती बदलली आहे. नारायण राणे आता काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या पुत्राचा पराभव झाला होता, आता ते स्वाभिमानकडून लढण्याची तयारी करीत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला आहे. येथे शिवसेनेचा उमेदवार नक्की आहे, मात्र इतर पक्षांकडून उमेदवारी कुणाला मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अलीकडच्या काळात शिवसेनेनेच अधिराज्य गाजवलेले आहे. शिवसेनेच्या भावना गवळी-पाटील यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता. त्याआधी २००९ मध्येही भावना गवळी याच निवडून आल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेसचा सतत पराभव झालेला असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला होता. मात्र तेथे २०१४ मध्ये ऐतिहासिक निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले विजयकुमार गावित यांची कन्या हीना गावित यांनी तेथे विक्रमी वेळा निवडून आलेल्या माणिकराव गावित यांना पराभूत करीत आपल्या नावे विक्रम नोंदवला. आता काँग्रेसकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. त्यामागे राष्ट्रवादीची काय गणिते आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता या ८ जागांबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नेमका काय निर्णय होतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. मात्र त्याचवेळी शिवसेना आणि भाजपाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघांपैकी किती ठिकाणी हे दोन्ही पक्ष जिंकतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”
“जगदीश भोवड