HomeArchive६ जानेवारीला पार्ल्याच्या...

६ जानेवारीला पार्ल्याच्या दीनानाथमध्ये “नैन सुरिले”! नेत्रहिन गुणी कलाकारांचा वाद्यवृंद

Details
“६ जानेवारीला पार्ल्याच्या दीनानाथमध्ये “”नैन सुरिले””! नेत्रहिन गुणी कलाकारांचा वाद्यवृंद”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

“नैन सुरिले” – हा नेत्रहिन गुणी कलाकारांचा वाद्यवृंद ६ जानेवारीला सकाळी ११ वाजता, विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या वर्ष १९९१ बॅचच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहून प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजातील दुर्बलांना त्यांच्या आयुष्यातील रात्रीसम असणाऱ्या क्षणकाल अंधारात साथसोबत करण्याच्या उद्देशाने कै. शांताराम मेमोरियल ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. जमलेल्या निधीतून पाच महत्त्वाचे समाजकार्य करणाऱ्या छोट्या पण गरजू संस्थांना मदत करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. यात कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी संस्था, इमारतबांधणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था, डोंबिवलीची अनाथाश्रम चालवणारी महिला संस्था यांचा समावेश होता. विलेपार्ले भागातील दिव्यांगांच्या शाळेच्या मुंबई दर्शन सहलीलाही त्या निधीतूनच सहाय्य केले गेले. या संस्थांची नावे अक्सेस लाईफ असिस्टन्स लिमिटेड, जननी आशिष चॅरिटेबल, नवजीवन लोकविकास संस्था, करुणाघर फांऊडेशन, वूमन अँड चाईल्ड केअर सोसायटी, दिलखुश स्पेशल चाइल्ड स्कूल, आपलं घर अशी आहेत. ३ वर्षे सातत्याने ते हे कार्य करीत आहेत. या कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी अथवा देणगीसाठी संपर्क प्रसाद वेलणकर: 9819777394, नीलेश पाटील: 932 240 4017″
 
“केएचएल ब्युरो

“नैन सुरिले” – हा नेत्रहिन गुणी कलाकारांचा वाद्यवृंद ६ जानेवारीला सकाळी ११ वाजता, विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या वर्ष १९९१ बॅचच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहून प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजातील दुर्बलांना त्यांच्या आयुष्यातील रात्रीसम असणाऱ्या क्षणकाल अंधारात साथसोबत करण्याच्या उद्देशाने कै. शांताराम मेमोरियल ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. जमलेल्या निधीतून पाच महत्त्वाचे समाजकार्य करणाऱ्या छोट्या पण गरजू संस्थांना मदत करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. यात कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी संस्था, इमारतबांधणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था, डोंबिवलीची अनाथाश्रम चालवणारी महिला संस्था यांचा समावेश होता. विलेपार्ले भागातील दिव्यांगांच्या शाळेच्या मुंबई दर्शन सहलीलाही त्या निधीतूनच सहाय्य केले गेले. या संस्थांची नावे अक्सेस लाईफ असिस्टन्स लिमिटेड, जननी आशिष चॅरिटेबल, नवजीवन लोकविकास संस्था, करुणाघर फांऊडेशन, वूमन अँड चाईल्ड केअर सोसायटी, दिलखुश स्पेशल चाइल्ड स्कूल, आपलं घर अशी आहेत. ३ वर्षे सातत्याने ते हे कार्य करीत आहेत. या कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी अथवा देणगीसाठी संपर्क प्रसाद वेलणकर: 9819777394, नीलेश पाटील: 932 240 4017”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content