HomeArchiveस्वातंत्र्याचा खरा अर्थ!

स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

Details
स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन आपण आज साजरा करतो आहोत. एका सार्वभौम प्रजासत्ताकाचे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण प्रतिनिधी आहोत. आपल्या घटनेने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत, स्वातंत्र्य दिले आहे. पण आपण खरेच मुक्त आहोत का, स्वतंत्र आहोत का, असे प्रश्न उभे व्हावेत, मनाला छळावेत अशीच अवतीभवतीची परिस्थिती आहे. स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून अभिमानाने मान उंचावते, पण तेव्हाच महिलांवरील अत्याचार, जुनाट बुरसटलेल्या रुढी-परंपरांचे जोखड आपल्या गळ्यात अजून असल्याचे जाणवून ती खालीही जाते. अशा किती घटना, घडामोडी दररोज वाचाव्या लागतात, सामोऱ्या येतात तेव्हा अस्वस्थतेशिवाय काहीही मनाचा ताबा घेत नाही.

प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशातील एक सूत्रधार वा सरचिटणीस म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली. ही सर्वार्थाने काँग्रेसची पक्षांतर्गत बाब आहे. पण यावरून भाजपामध्ये जे काही काहूर उठले आहे ते पाहण्यासारखे आहे. सर्वशक्तीमान अशा भाजपाची आयटी फौज कामाला लागली, टीकेचे बाण सुटले. ते बाण जोपर्यंत सभ्यतेच्या संकेताला धरून आहेत तोपर्यंत योग्य म्हणता येतील. पण, प्रियंका साधीसुधी व्यक्ती नाही. काँग्रेसच्या दोन आगामी अध्यक्षांची माता आहे.. प्रियंका फक्त सुंदर आहे, त्यांचे कर्तृत्त्व काही नाही.. असे जेव्हा तारे तोडले जातात, स्त्रीत्वाचा, मातृत्त्वाचा हीन भाषेत अपमान केला जातो तेव्हा आम्ही संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्या पक्षाची आणि त्यांच्या समर्थकांची कीव वाटते आणि चीडही येते. महिलांना हीन लेखण्याच्या मानसिकतेतून आजही आपल्याच समाजातील काही मंडळी बाहेर पडलेली नाहीत त्या समाजाला स्वतंत्र कसे म्हणावे? ज्या समाजात महिलांची अशी हेटाळणी केली जाते तिथे महिलांना तरी स्वतंत्र कसे समजावे? आणि हे प्रश्न ज्या समाजाला छळत नाहीत तो समाज तरी स्वतंत्र कसा समजणार? जिथे वासनांध व्यक्तींच्या तावडीतून लहान मुली, शालेय विद्यार्थीनीही सुटत नाहीत त्या अश्राप मुली मुक्त कशा समजायच्या? घरामधील मुलीही सुरक्षित नाहीत तो समाज कुणाला स्वातंत्र्य देतोय की पारतंत्र्यात ठेवतोय असा विचार करण्याची ही वेळ आहे.

डोंबिवलीत अत्याचार होतात, ठाण्यात होतात, पंढरपुरात शिक्षकच मुलींचा गैरफायदा घेतात, देशात ठिकठिकाणी महिलांना घरात आणि सार्वजनिक ठिकाणीही भयभीतपणे वावरावे लागते, अत्याचारच नव्हे भेदभावानांही सामोरे जावे लागते, हिंसेला सामोरे जावे लागते, अपमानाला सामोरे जावे लागते. देवस्थानांचे दरवाजे महिलांसाठी बंद असतात, तिहेरी तलाक म्हणत त्यांना घटस्फोट दिला जातो, त्यांचे पोटगीसारखे न्याय्यहक्कही डावलले जातात, जिथे महिलांना कंपन्यांच्या संचालक मंडळावर जागा मिळावी म्हणून कायदा करावा लागतो त्या देशातील स्वातंत्र्य नेमके कुणासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. जिथे समाजविघातक रुढींना प्राधान्य मिळते, जिथे जातपंचायत कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरते, ज्या जातपंचायतीसमोर मान तुकवून सुशिक्षित आईवडिल मुलीच्या कौमार्याचा निर्णय करायला अनुमती देतात, सुशिक्षित असूनही वराला अशी रानटी रुढी मान्य असते तिथे स्वातंत्र्याचे मोल काय हा प्रश्न उरतोच. मासिक पाळीचा विटाळ, हुंडा या अपप्रथांना जिथे समाजमान्यता आहे तो देश स्वतंत्र झाला असे म्हणायचे का? वधुपक्षाकडूनच विवाहाचा सर्व खर्च झाला पाहिजे, नवा संसार वधूपक्षानेच उभारून दिला पाहिजे, हुंडाही दिला पाहिजे आणि घरही भरून दिले पाहिजे, लग्नानंतरही पाहिजे तेव्हा मुलीने वडिलांकडून पैसे आणून दिले पाहिजेत, पतीकडच्या सगळ्यांचे व्यवस्थित मानपान झाले पाहिजे अशा मानसिकतेतून समाज बाहेर पडला तर आपल्याला खरेखुरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल.

काही व्यक्ती असतात की ज्यांच्या घरी मुलींचा सन्मान केला जातो, दोन-तीन मुलीही जरी झाल्या तरी कपाळ बडवले जात नाही, मुलींनाही तितक्याच लाडाने वाढवले जाते, त्यांना प्रगतीची दारे खुली केली जातात. या व्यक्तींना, कुटुंबाना स्वतंत्र म्हणायला हरकत नाही. मुलींच्या नरड्याला नख लावणारे, त्यांच्यावर हात टाकणारे, त्यांना भोगवस्तू समजणारे सर्व पारतंत्र्यातच आहेत. अशा पारतंत्र्यातील व्यक्तींसाठीच बेटी बचाव.. जनजागरण करायची वेळ आज आपल्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाजात, सार्वभौम प्रजासत्ताकात यावी हे फारसे भूषणावह नाही. ही परिस्थिती बदलू शकते. पण त्यासाठी निर्धार हवा. बुरसटलेल्या, रानटी रुढींच्या शृंखला मोडीत काढायला हव्यात. मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून यायला हवा. स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येकाला समजायला हवा. आपले स्वातंत्र्य हे दुसऱ्यांचे स्वातंत्र्य गडप करणारे किंवा अन्य व्यक्तीच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे, इतरांचे शोषण करणारे असेल तर त्याचा फायदा काय हा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत असे म्हणता येईल.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content