HomeArchiveस्वप्नाक्षय मंडळाने साकारले...

स्वप्नाक्षय मंडळाने साकारले प्रगतशील भारत

Details
स्वप्नाक्षय मंडळाने साकारले प्रगतशील भारत

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
  
मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.
 
 
या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.
 
 
येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
  
“मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.”
 
 
“या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.”
 
 
“येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content