Details
स्त्री भ्रुणहत्त्येची कीड ठेचायलाच हवी
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
स्त्री भ्रुणहत्त्या हा आपल्या समाजातील अत्यंत संवेदनशील विषय आहे. गर्भात असतानाच मुलीचा जीव घेतल्याने आज देशातील अनेक राज्यांत मुलींचा जन्मदर खूपच कमी झालेला आहे. मुलांच्या संख्येच्या तुलनेत मुलींची संख्या बहुतांश राज्यांत कमालीची घसरली असल्याचे दिसून येत आहे. आजदेखील पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार करणारे समाजघटक अस्तित्त्वात आहेत याचेच खरेतर अप्रूप वाटते. या घटकांच्या माध्यमातून पुरूषी अहंकार पुढे रेटला जात आहे व त्यामुळे वंशाचा दिवा वगैरे या संकल्पना आजदेखील जोर धरून आहेत. आज अनेक कुटुंबे आपण पाहिली तर मुलगा व्हावा यासाठी नवस, आराधना व गर्भलिंगपरीक्षा करत असताना आपणास दिसतात.
मुलगा हाच वंशाचा दिवा, तोच आपल्या वृद्धापणातील आसरा ही सामान्य माणसाची संकल्पना असते. मुलगी कितीही चांगली असली तरी ती परक्या घरची, एक ना एक दिवस ती आईवडिलांना सोडून परघरी जाणार हा निसर्गनियम स्वीकारून अनेकजण स्त्री भ्रुणहत्त्येचा टोकाचा निर्णय स्वीकरत आहेत. पण आज जर आपण नीट डोळे उघडे ठेवून पाहिले तर सर्वच क्षेत्रांत मुली मुलांपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे आपणास आढळून येईल. शिक्षण, खेळ, नोकरी, व्यवसाय, घर या सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एकाचवेळी पत्नी, आई, बहीण, गृहिणी व इतर कितीतरी नाती फक्त एक स्त्रीच निभाऊ शकते. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते हे आपण उपहासाने नाही तर अभिमानाने म्हणतो तेदेखील याचसाठी.
मुलांच्या बाबतीत आढळणारी व्यसनाधीनता, असंगती, संस्कृतीचा अभाव, बेरोजगारी, अशिक्षितपणा ह्या गोष्टी मुलींमध्ये क्वचितच आढळून येतील. लग्न होऊनदेखील आईवडिलांबद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी, माया, सन्मान, आदर या गोष्टी मुलांच्या तुलनेत मुलींकडे काकंणभर जास्तच दिसून येतील. यामुळे एक किंवा दोन मुलींवरच समाधान मानणारी अनेक आदर्श कुटुंबे समाजात दिसून येतील. खरेतर त्यांचा समाजातून सन्मानाच व्हायला पाहिजे. स्त्री भ्रुणहत्त्येची कीड आपल्या समाजास ज्यांच्यामुळे लागली आहे त्यांचा सर्व स्तरातून निषेध व्हायला पाहिजे. काही मोजके स्वार्थी लोक समाजाचा समतोल बिघडविण्याचे काम करत आहेत. त्यांना वेळीच आवरले गेले पाहिजे.
सोनोग्राफीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी उपयोगी पडणाऱ्या यंत्राचा वापर गर्भलिंग निदानासाठी केला जात आहे. ज्यामुळे अनेक निष्पाप जीव जन्माला येण्याआधीच संपवले जात आहेत. हे खरतर खूपच भयानक आहे. केवळ पुरूष जन्माला आले पाहिजेत या पाशवी वृत्तीपायी आज स्त्री-पुरूष लोकसंख्येचा सामाजिक समतोलदेखील ढासळत चालला आहे. प्रत्येकाला आपल्या घरात एक चांगली पत्नी हवी असते, प्रेमळ आई पाहिजे, भावावर जीव ओवळणारी बहीण पाहिजे पण मुलगी नको ही वृत्ती कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकतेची गरजेची आहे. व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल माध्यमांचा वापर याकामी खूपच प्रभावी ठरू शकतो. सामाजिक कार्यात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, राजकीय पुढारी, कुटुंबप्रमुख हे घटक या कामामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या वतीने स्त्री भ्रुणहत्त्या रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर शासकीय पथकांमार्फत छापे मारण्यात येत आहेत. दोषी लोकांवर व त्यांच्या यंत्रासमुग्रीवर सीलबंदीची व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील गाजलेले डॉ. मुंडे प्रकरण सर्वश्रूत आहेच. त्यामुळे गर्भलिंगनिदानविरोधी कायदा अत्यंत कडक करण्यात आलेला असून अशाप्रकारे बेकायदा व्यवसाय करणाऱ्या व गर्भलिंगनिदान चाचणीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या कोणाचीही गय केली जात नाही. तसेच त्यांना समाजदेखील कधीच पाठीशी घालत नाही व माफ करत नाही, करणारही नाही. त्यामुळे आता खरी जागरूकतेची गरज आहे ती लोकांमध्ये.
अशाप्रकारे मुलीच्या गर्भाचा जीव घेणे एकप्रकारे परमेश्वराने दिलेल्या वरदानाला ठोकरण्यासारखे आहे. निसर्गाविरूद्ध चालण्यासारखे आहे. स्त्री-पुरूष समानता ही काळाची व सामाजिक गरज आहे. त्याचा समतोल बिघडवण्याचे काम जाणीवपूर्वक करू नका. नाहीतर तुमच्या वैयक्तिक स्वार्थापायी, तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे येणारी भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यांचे समाजजीवन उद्धस्त केल्याचे पातक माथी मारून घेऊ नका. गर्भलिंगनिदान करणे एक गंभीर गुन्हा व सामाजिक अपराध आहे. त्यापासून दूर राहा व आपल्या समाजालासुद्धा दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
“मुलगी वाचवा, देश वाचवा””
“वैभव मोहन पाटील