HomeArchiveसुट्टीचा आनंद लुटा...

सुट्टीचा आनंद लुटा पोगोच्या कलारी किड्सद्वारे!

Details
सुट्टीचा आनंद लुटा पोगोच्या कलारी किड्सद्वारे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कल्पना करा की, जादू आणि रहस्यांनी भरलेलं एक घनदाट जंगल आहे, चित्तथरारक स्टंट, हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि चित्ताकर्षक साहसी खेळ हे सगळंच तिथे आहे. तर तयार व्हा. पोगोचा (POGO) सर्वांत नवा शो कलारी किड्स पाहण्यासाठी. चला तर मग व्हा तयार एका अविस्मरणीय उन्हाळी सुटीचा आनंद लुटायला. कारण बच्चे कंपनीच्या लाडक्या चॅनलने आणलेली साहसी कार्यक्रमाची मेजवानी येत्या १५ एप्रिलपासून वीकडेजला दररोज संध्याकाळी ५ वाजता तुमच्यासाठी आयोजित केली आहे.

जुन्या काळातलं वैभव आणि भारतातील प्रेमाची ऊब त्याचबरोबर नव्या युगाची सौम्यता आणि आनंदाने हा शो सजला आहे. प्राचीन मार्शल आर्ट कल्लरीपयट्टू शिकण्यापासून ते कलारीपुरमच्या जादुई जंगलात राहण्याचा थरार कलारी किड्स अनुभवणार आहेत.

या कूल किड्सना गुरू पालन आणि गुरू वेता या दोन गुरूंकडून शिक्षण मिळणार आहे. गुरू पालनच्या संघात असलेले बीनू, मीना, श्याम, उन्नी आणि अमी आणि गुरू वेताच्या संघातील राका, धाना, मणि, लेखा, लंगोट आणि मॉन्स्टर यांच्यात नेहमीच चढाओढ सुरू असते. मुलांचं वय आणि निरागसता लक्षात घेऊन गुरू पालन साध्या सोप्या पद्धतीने आपल्या शिष्यांतील गुण विकसित करण्याच्या प्रयत्नात असतात, तर गुरू वेतांचा राकट मिलिटरी प्रकारच्या प्रशिक्षणावर विश्वास आहे. त्यांच्या प्रशिक्षण व कलरीपयट्टूनंतर मुले आपल्या सामान्य आयुष्यात परत जातात आणि एकमेकांच्या खोड्या काढत आनंदात राहतात.

या कार्यक्रमाचे दृश्य दिग्दर्शन भारतीय पारंपरिक चित्रांतील सौंदर्य दाखवण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. दमदार पॅनलिंग आणि हाय कॉन्ट्रास्ट स्टाइलमुळे तरूण चाहत्यांना एक उत्तम अनुभव मिळेल. भारतीय शास्रीय संगीत आणि आधुनिक संगीताचा मेळ घातलेले व आकर्षक चालीचे आनंदाने भरलेले कलारी थीम साँग, हे नक्कीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होईल.
या कार्यक्रमाच्या POGO चॅनलवरील टीव्ही प्रीमिअरबद्दल टर्नर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ जैन म्हणाले की, ‘मुलांना आवडेल असे कार्यक्रम देण्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू असतो जेणेकरून आमच्या प्रेक्षकांशी आमचे दृढ नाते निर्माण होते. त्याचबरोबर देशातच तयार झालेल्या आणि स्थानिक कार्यक्रमांनी पोगोच्या कार्यक्रमांच्या नीतीमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला विश्वास आहे की कलारी किड्समुळे आमच्या छोट्या दोस्तांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ होईल.’

विविध शहरांत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चाहत्यांना हाय-इम्पॅक्ट, ३६०-डिग्री अभियानातील जमिनीवरील आणि डिजिटल प्रकारातील विविध अनुभव मिळणार आहेत. त्याचबरोबर अॅक्शन हिरो आणि स्टार कलाकार विद्युत जामवालच्या जंगली या कौटुंबिक साहसी चित्रपटाचाही या कार्यक्रमांमधील उपक्रमांमध्ये समावेश आहे.

तुमची उत्सुकता वाढवण्यासाठी आणखीही बरेच काही या इव्हेंटमध्ये आहे. छोटे दोस्त मुंबईच्या मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये असलेल्या एका ऑगमेंटेड रीअॅलिटी बूथमध्ये कलारी किड्सच्या दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकणार आहेत. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी मुलांना हा आनंद लुटता येणार आहे. पोगोने आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आधीच्या तुलनेत नवीन आणि अधिक आकर्षक प्रयत्न म्हणून डिजिटल इनोव्हेशनचा उपयोग केला आहे.

त्याचबरोबर या मे महिन्यात मुलांचा सुपरहिरो भीमही अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घेऊन आला असून कलारी किड्सच्या दुनियेची देशभरात विविध ठिकाणी ओळख करून देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. टीव्हीवरून घेतल्या जाणाऱ्या एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टूनना भेटण्याची तसेच कलारी किड्ससोबत भीमचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ग्रीन गोल्ड अनिमेशनने तयार केलेला हा कार्यक्रम चाहत्यांसाठी POGO वर तमिळ, हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content