Details
‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’चा यथोचित सन्मान
01-Jul-2019
”
पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सिग्नलवरील वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘समर्थ भारत व्यासपीठ’ व वृद्धांना मायेची सावली देणाऱ्या ‘श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ’ या सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. व्यावसायिक सामजिक दायित्वच्या (सिएसआर) माध्यमातून एसबीआय लाईफ इन्शुरन्सतर्फे या दोन्ही संस्थांना मदतीचा हात पुढे करत धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी समर्थ भारत व्यासपीठचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, अक्कलकोट सेवा मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी रहातेकर, मराठी चित्रपट अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री विशाखा सुभेदार, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आनंद पेजावर आदी उपस्थित होते.
या सहयोगाद्वारे, श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ येथे एकूण वीजबिलात जवळजवळ ८० टक्के बचत करण्यास मदत करणारी ‘ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’ उभारण्यासाठी आणि समर्थ भारत व्यासपीठतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘सिग्नल स्कूल’च्या ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी या दोन्ही संस्थांच्या सामाजिक कर्यासंबंधी गौरवोद्गार काढले. तसेच या समाजातील वंचित मुले व वृद्ध मायबाप यांना दयेची नाही तर मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे अशी आशाही श्रोत्री यांनी व्यक्त केली. यावेळी आनंद पेजावर यांनी वयस्कर व्यक्ती व रस्त्यावर राहणारी मुले यांना उत्तम जीवन देण्यासाठी श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ व समर्थ भारत व्यासपीठ यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले.”
“पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान