HomeArchiveसाई रूग्णवाहिका प्रकल्पासाठी...

साई रूग्णवाहिका प्रकल्पासाठी शासनाची मान्यता! संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची माहिती

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने राज्‍यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रूग्‍णांना तत्‍काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील आरोग्‍य/रूग्‍णसेवेच्‍या क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या नोंदणीकृत स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रत्‍येकी एक याप्रमाणे सुमारे ५०० रूग्‍णवाहिका उपलब्‍ध करून ‘साई रूग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी येणाऱ्या २५ कोटी रूपयांच्या खर्चास राज्यशासनाने मान्‍यता दिली असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे.

साई रूग्‍णवाहिका प्रकल्‍पामुळे राज्‍यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील रूग्‍णांना संस्‍थानच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होणाऱ्या रूग्‍णवाहिकांमुळे तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणे शक्‍य होणार आहे. परिणामी श्री साईबाबांचा रूग्‍णसेवेचा हेतू साध्‍य होणार असून श्री साईबाबांच्‍या शिकवणीचा प्रचार होणार आहे. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, अधिनियमात मानवजातीचे कल्‍याण करणाऱ्या किंवा मानवाला आपत्‍तीमध्‍ये सहाय्य करणाऱ्या अन्‍य कोणत्‍याही उदात्‍त कार्याला चालना देण्‍यात येईल, अशी तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार श्री साईबाबा संस्‍थानमार्फत महाराष्‍ट्र राज्‍यातील आरोग्‍य/रूग्‍णसेवेच्‍या क्षेत्रात कार्यरत नोंदणीकृत संस्‍थेस प्रत्‍येकी एक याप्रमाणे ५०० रूग्‍णवाहिकांना प्रत्‍येकी पाच लाख रूपये याप्रमाणे अनुदान देण्‍यात यावे. अशी रक्‍कम सदर संस्‍थेला न देता मागणी करणाऱ्या संस्‍थेने महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीकडे आगाऊ रक्‍कम (रूपये पाच लाख वजा करून) भरावी व कागदपत्रांची पूर्तता करावी. अशी रक्‍कम त्‍यांनी भरल्‍यानंतर संस्‍थानतर्फे पाच लाख रूपयांचे अनुदान परस्‍पर कंपनीला देण्‍यात यावे. संबंधित संस्‍थेशी करारनामा करून घेण्‍यात यावा. रूग्‍णवाहिकेसाठी महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा बोलेरो BS-IV हे मॉडेल निश्चित करण्‍यात यावे. प्रत्‍येक रूग्‍णवाहिकेस GPS System बसवून घेण्‍यात यावी. रूग्‍णवाहिकेच्‍या नोंदणी व विम्‍याची जबाबदारी संबंधित संस्‍थेची राहील. रूग्‍णवाहिकेवर “श्री साई रूग्‍णवाहिका” असे नमूद करण्‍यात यावे, अशा अटी व शर्तींवर संस्‍थानच्‍या ५०० रूग्‍णवाहिका खरेदी करण्‍याच्‍या ‘साई रूग्‍णवाहिका प्रकल्‍प’ उपक्रमासाठी शासनाने २५ कोटींच्या निधीला शासनाने मान्‍यता दिली असल्याचेही डॉ. हावरे यांनी स्पष्ट केले.

वरील अटी व शर्तींस अधिन राहून इच्‍छुक स्‍वयंसेवी संस्‍थांनी संस्‍थानच्‍या वाहन विभागाच्या दूरध्‍वनी क्रमांक (०२४२३) २५८७८७ व मो. नं. ७७२००७७२५९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. हावरे यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content